इंदिरानगर येथील पोस्ट उपकार्यालय गैरसोयीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:02 PM2019-03-16T23:02:51+5:302019-03-17T00:28:05+5:30

जॉगिंग ट्रॅकलगत असलेले पोस्ट उपकार्यालय गैरसोयीचे ठरत असून, हे पोस्ट उपकार्यालय मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

Post Offices of Indiranagar are inconvenient | इंदिरानगर येथील पोस्ट उपकार्यालय गैरसोयीचे

इंदिरानगर येथील पोस्ट उपकार्यालय गैरसोयीचे

Next
ठळक मुद्देपरिसरातील नागरिक त्रस्त : मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय स्थलांतर करण्याची मागणी

इंदिरानगर : जॉगिंग ट्रॅकलगत असलेले पोस्ट उपकार्यालय गैरसोयीचे ठरत असून, हे पोस्ट उपकार्यालय मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
नासर्डी ते पाथर्डी दरम्यान सुचितानगर, दीपालीनगर, विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर, राणेनगर, वासननगर, समर्थनगर, पांडव नगरी, सार्थकनगर यांसह विविध उपनगरे असून, यामध्ये हजारोच्या संख्येने लोकवस्ती आहे. संगणक आणि मोबाइलच्या जमान्यात आजदेखील पोस्टाचे तितकेच महत्त्व आहे त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार सात वर्षांपूर्वी जॉगिंग ट्रॅकलगत एका अपार्टमेंटमध्ये छोट्याशा खोलीत पोस्टाचे उपकार्यालय सुरू करण्यात आले आहे. परंतु ते अडचणीच्या ठिकाणी असल्याने नागरिकांना सापडणे मुश्कील होत आहे. त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
अनेकवेळा मध्यवर्ती ठिकाणी उपकार्यालय हलविण्याची मागणी केली आहे. सदर पोस्ट उपकार्यालय धूळखात पडून असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पोस्टानेच वाहन परवाना, आरसी बुक, एटीएम कार्ड, बँकेचे पासबुक यांसह सरकारी पत्रे येतात. त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी पोस्टाचे उपकार्यालय असणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांना रिक्षा करून पोस्ट उपकार्यालयात ये-जा करावी लागत असल्याने त्यांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Post Offices of Indiranagar are inconvenient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.