उपसभापतीसह दोन संचालकांचे पद रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:34 AM2021-02-05T05:34:56+5:302021-02-05T05:34:56+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भाऊसाहेब खांडबहाले २०१७ ते २०२२ कालावधीसाठी झालेल्या महिरावणी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सदस्यपद आहे, ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भाऊसाहेब खांडबहाले २०१७ ते २०२२ कालावधीसाठी झालेल्या महिरावणी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सदस्यपद आहे, असा पुरावा जिल्हा उपनिबंधकांकडे सादर न केल्याने संचालकपद रिक्त करण्यात आले. संचालक संजय तुंगार ऑगस्ट २०१५ ते २०२० कालावधीत शिंदे ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले नाहीत तर उपसभापती रवींद्र भोये २०१५ ते २०२० कालावधीसाठी झालेल्या ग्रामपंचायत गटातून निवडून आलेले होते. ते त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दलपतपूर येथून ग्रामपंचायत गटातून पंचायत समितीवर निवडून गेल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यपद बंद झाले ते बाजार समिती उपसभापती म्हणून विराजमान होते.
तीन संचालकांचे ग्रामपंचायत सदस्यांचे पद बंद झाले होते तरी बाजार समिती कलमाचा भंग करत बाजार समिती संचालकपद सुरू ठेवले. शासनाची फसवणूक केल्याचे याचिकाकर्ते देवानंद बैरागी यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे दाखल केलेल्या दाव्यात म्हटले होते. तीन संचालकांनी ग्रामपंचायत सदस्य असल्याचा पुरावा सादर केला नाही म्हणून शुक्रवारी अंतिम निर्णय देत विद्यमान उपसभापती रवींद्र भोये, संजय तुंगार व संचालक भाऊसाहेब खांडबहाले यांचे संचालकपद रिक्त करण्यात आल्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दाव्यावर सुनावणी घेतल्यानंतर दिले आहेत.