एकलहरे वीज केंद्रात श्वान पथक तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 05:56 PM2018-08-20T17:56:48+5:302018-08-20T17:58:27+5:30

एकलहरे वसाहतीत स्वत:ला भाई म्हणून फेमस होण्यासाठी एका युवकाने काही दिवसांपूर्वी स्वत:वर गोळीबार घडवून आणला होता. या घटनेमुळे एकलहरे वसाहतीतील नागरिकांत भीतीचे सावट निर्माण झाले तर एकलहरे औष्णिक वीज केंद्राच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित झाला होता. या घटनेची दखल घेत

Posted in Squared squad at Ekolhar power station | एकलहरे वीज केंद्रात श्वान पथक तैनात

एकलहरे वीज केंद्रात श्वान पथक तैनात

Next
ठळक मुद्देसुरक्षितता : संशयितांवर राहणार नजर डॉबरमॅन व किंगकोब्रा जातीच्या श्वानांचा समावेश

नाशिक : येथील नाशिक औष्णिक वीज केंद्र परिसर व कामगार वसाहतीच्या सुरक्षेसाठी सध्या असलेल्या सुरक्षा यंत्रणेव्यतिरिक्त सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी श्वान पथकही तैनात करण्यात आले आहे.
एकलहरे वसाहतीत स्वत:ला भाई म्हणून फेमस होण्यासाठी एका युवकाने काही दिवसांपूर्वी स्वत:वर गोळीबार घडवून आणला होता. या घटनेमुळे एकलहरे वसाहतीतील नागरिकांत भीतीचे सावट निर्माण झाले तर एकलहरे औष्णिक वीज केंद्राच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित झाला होता. या घटनेची दखल घेत मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी एकलहरे वसाहत व वीज केंद्र परिसराची सुरक्षा व्यवस्था कडक केली. चेमरी नंबर एकचे गेट क्रमांक एक व सिद्धार्थनगर जवळील नवीन डी टाइपचे गेट नंबर दोन येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांची, वाहनांची, एस.टी. बसेसची तपासणी करूनच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे अनावश्यक ये-जा करणारे व आगंतुकांना आळा बसण्यास मदत झाली. परंतु एकलहरे वीज केंद्राच्या सुरक्षिततेचा विचार करता १८ आॅगस्टपासून परिसरात श्वान पथक तैनात करण्यात आले आहे.
सुरक्षा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक किशोर फडतरे यांच्या नियंत्रणाखाली श्वान पथक कार्यरत असून, त्यात प्रशिक्षित डॉबरमॅन व किंगकोब्रा जातीच्या श्वानांचा समावेश आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रशिक्षित कर्मचारीही आहेत. हे श्वानपथक वीज केंद्र व रहिवासी कॉलनी व्यतिरिक्त वसाहतीबाहेरील सिद्धार्थनगर, हनुमाननगर, देशमुखवाडी, पहाडीबाबा झोपडपट्टी, एकलहरे गाव, वीज केंद्राची चहुबाजूची संरक्षक भिंत, एकलहरे बंधारा, गंगावाडी परिसर या भागात गस्त घालेल. या प्रशिक्षित श्वान पथकामुळे भुरट्या चोºया व संशयित इसमांना आळा बसेल. वीज केंद्र प्रशासनाच्या वतीने पंचक्रोशीतील रहिवाशांना आवाहन करण्यात आले आहे की, वीज केंद्र व वसाहतीमध्ये कोणीही अनधिकृतपणे प्रवेश करू नये तसेच मोकाट जनावरे वसाहतीमध्ये सोडू नयेत. रात्री-अपरात्री कोणीही फिरू नये, वसाहतीत प्रवेश करतेवेळी विशेष दक्षता घ्यावी.
(फोटो आरवर २० एकलहरे नावाने) एकलहरे वीज केंद्राच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले श्वान पथक व कर्मचारी.

Web Title: Posted in Squared squad at Ekolhar power station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.