आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी पूर्व परीक्षा स्थगित ; आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 08:15 PM2020-07-25T20:15:16+5:302020-07-25T20:22:10+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२० मधील विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रण डॉ. अजित पाठक यांनी शनिवारी (दि.२५) दिली. अंतिम वर्षाच्या घेण्यात येऊ नये या मागणीसंदर्भातील प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट असल्याने या परीक्षेसंदर्भात न्यायलायच्या निकालानंतरच निर्णय होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना व विद्यापीठाला न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२० मधील विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रण डॉ. अजित पाठक यांनी शनिवारी (दि.२५) दिली. अंतिम वर्षाच्या घेण्यात येऊ नये या मागणीसंदर्भातील प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट असल्याने या परीक्षेसंदर्भात न्यायलायच्या निकालानंतरच निर्णय होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना व विद्यापीठाला न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, नर्सिंग, भौतिकोपचार आदी विद्या शाखांचे पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठाने यापूर्वी संकेतस्थळावर जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येणार आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. परीक्षा घेण्यात येऊ नये या मागणीच्या दोन याचिका आणि पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षा लवकर घेण्यात याव्यात या मागणीसाठी एक याचिका अशा एकूण तीन याचिका परीक्षेच्या अनुषंगाने झालेल्या असून, तीनही याचिकांबाबत उच्च न्यायालयात दि. ३१ जुलैला सुनावणी होणार आहे. त्या निर्णयानंतरच सविस्तर आदेश काढण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आरोग्य शिक्षणातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व संबंधितांनी परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही अफ वांवर विश्वास ठेवू नये. तसेच परीक्षेसंदर्भात कोणत्याही परिपत्रकाची खातरजमा करण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विद्यापीठाला सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होण्याची प्रतीक्षा करण्याच्या सूचना केली होती. त्यानंतर विद्यापीठाकडून परीक्षांना स्थगितीचा निर्णय जाहीर केला आहे.