हरिलाल अस्मर यांना मरणोत्तर जीवनगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 11:18 PM2022-07-02T23:18:30+5:302022-07-02T23:19:33+5:30
मालेगाव कॅम्प : शहरातील अर्थवाहिनी समजली जाणारी मालेगाव मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्याबरोबरच बँकेचे संस्थापक दिवंगत हरिलाल अस्मर यांना मरणोत्तर जीवनगौरव सन्मानपत्र त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रदान करण्यात आले.

मालेगाव येथे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आय.एम.ए. सभागृहात साठावी सर्वसाधारण सभा झाली. यावेळी भोसले यांनी बँकेची सांगितले की, कोविडनंतर बँकेने मोठी प्रगती केली आहे. याचा परिणाम म्हणून बँकेची चांगली थकबाकी वसुली झाल्याने निव्वळ एनपीए ५.८३ टक्के इतका खाली आला आहे. बँकेला अहवाल वर्षात ५ कोटी ४९ लाखांचा ढोबळ नफा झाला, तर इतर तरतुदी वजा जाता निव्वळ नफा २ कोटी ११ लाख १८ हजाराचा नफा झालेला आहे. बँकेचे उपाध्यक्ष गौतम शहा यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेला संचालक सतीश कलंत्री, शरद दुसाने, ॲड. संजय दुसाने, नरेंद्र सोनवणे, भिक्षा कोतकर, दादाजी वाघ, सतीश कासलीवाल, भरत पोफळे, नंदू सोयगावकर, छगन बागुल, अशोक बैरागी, संचालिका मनीषा देवरे, मंगला भावसार, तज्ज्ञ संचालक भास्कर पाटील आदींसह व्यवस्थापक कैलास जगताप, विरेंद्र होनराव, अनिल सुगंधी, मिलिंद गवांदे उपस्थित होते.