पोस्टमनची सायकल राईड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:23 AM2017-10-29T00:23:02+5:302017-10-29T00:23:07+5:30
‘डाकिया डाक लाया...’ या गीताच्या ओळी काळानुरूप जुन्या झाल्या आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ‘डाकिया’ अर्थात पोस्टमन घटकदेखील दुर्लक्षित झाला; मात्र ग्रामीणसह शहरी भागात पोस्टमन आजही तितकाच गरजेचा घटक आहे.
नाशिक : ‘डाकिया डाक लाया...’ या गीताच्या ओळी काळानुरूप जुन्या झाल्या आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ‘डाकिया’ अर्थात पोस्टमन घटकदेखील दुर्लक्षित झाला; मात्र ग्रामीणसह शहरी भागात पोस्टमन आजही तितकाच गरजेचा घटक आहे. टपाल खात्याची खरी ओळख पोस्टमन, तर पोस्टमनची खरी ओळख म्हणजे त्याच्या खांद्यावरील थैला आणि त्याची सायकल आहे. हे समीकरण लक्षात घेऊन टपाल खात्याच्या वतीने शहरातून तब्बल ७५ पोस्टमनांची सायकल फेरी शनिवारी (दि.२८) काढण्यात आली. टपाल खात्याचे महत्त्व नव्या पिढीला लक्षात यावे आणि संदेशवहनाचा एकेकाळी कणा मानल्या जाणाºया टपाल खात्याची खरी ओळख बनलेल्या पोस्टमन घटकाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने नाशिक टपाल खाते व सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने ‘पोस्टमन सायकल फेरी’चे आयोजन करण्यात आले होेते. आमदार सीमा हिरे, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, प्रवर डाक अधीक्षक पी. जे. काखंडकी, सहायक अधीक्षक पंकज कुलकर्णी वरिष्ठ पोस्टमास्तर मोहन अहिरराव, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण खाबिया, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा आदी मान्यवर उपस्थितीत झेंडा दाखवून ‘पोस्टमन सायकल फेरी’चा शुभारंभ करण्यात येऊन गोल्फ क्लब येथे समारोप झाला.