मुक्त विद्यापीठाचा २८ चा पेपर पुढे ढकलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:31 AM2018-05-26T00:31:30+5:302018-05-26T00:31:30+5:30
यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठाच्या मे सत्रातील परीक्षांना प्रारंभ झाला असून, राज्यातील ७३६ परीक्षा केंद्रांवर परीक्षेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, येत्या २८ रोजी होणारा पेपर रद्द करण्यात आला असून, सदर पेपरचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. काही केंद्रांवरील परीक्षेची वेळ आणि प्रश्नपत्रिकांतील त्रुटी वगळता राज्यात सर्वत्र परीक्षा शांततेत पार पडली असून, कोणतीही तक्रार परीक्षा विभागाला प्राप्त झाली नसल्याचे विद्यापीठाने कळविले आहे.
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठाच्या मे सत्रातील परीक्षांना प्रारंभ झाला असून, राज्यातील ७३६ परीक्षा केंद्रांवर परीक्षेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, येत्या २८ रोजी होणारा पेपर रद्द करण्यात आला असून, सदर पेपरचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. काही केंद्रांवरील परीक्षेची वेळ आणि प्रश्नपत्रिकांतील त्रुटी वगळता राज्यात सर्वत्र परीक्षा शांततेत पार पडली असून, कोणतीही तक्रार परीक्षा विभागाला प्राप्त झाली नसल्याचे विद्यापीठाने कळविले आहे. राज्यातील ७२६ परीक्षा केंद्रांवरून सुमारे ६ लाख ४५ हजार १५७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. बीए. बीकॉम, बीएस्सी,बी-लिब, वृत्तपत्रविद्या, कृषी, वाणिज्य, व्यवस्थापन, संगणकशास्त्र, आरोग्य आदी विविध ९६ अभ्यासक्रमांच्या १०२३ विविध विषयांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. सुमारे ५ लाख ८३ हजार ७३० विद्यार्थी लेखी परीक्षा देणार आहेत, तर ६१ हजार ४२७ विद्यार्थ्यांची परीक्षा ही आॅनलाइन पद्धतीने होणार आहे. नांदेडमधील विद्यार्थ्यांची संख्या ९६ हजार ९३० इतकी आहे. सर्वात कमी ४३ हजार ६६१ विद्यार्थी हे मुंबई विभागीय केंद्रातील आहेत. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर, पुणे, मुंबई व नाशिक या आठ विभागीय केंद्रांवर सदर परीक्षा होत आहे.
संवेदनशील परीक्षा केंद्र
राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या संवेदनशील परीक्षा केंद्रावरदेखील परीक्षा होत असून, एकूण आठ दुर्गम भागातील केंद्रांवर परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी ४ हजार ८६४ विद्यार्थी बसलेले आहेत. रद्द झालेला पेपर अखेरच्या दिवशी महाराष्टतील भंडारा, पालघर आणि गोंदिया या मतदारसंघांमध्ये लोकसभा पोटनिवडणूक असल्याने दि. २८ रोजी होणारा पेपर रद्द करण्यात आलेला आहे. सदर पेपर हा ज्या अभ्यासक्रमाचा शेवटचा पेपर संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच घेतला जाणार आहे, अशी माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली.