नाशिक जिल्ह्यातील्जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:41 PM2020-03-17T23:41:17+5:302020-03-17T23:41:39+5:30
नाशिक : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीने निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व निवडणूक कार्यक्रम स्थगित केले असल्याने नाशिक जिल्ह्यातील्जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम स्थगिता १०२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रमदेखील स्थगित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

चालू महिनाअखेरीस जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. शुक्रवारपासून (दि. ६) नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली असतानाच आता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणुकीचा कार्यक्रम आहे. त्या स्थितीत स्थगित करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती कायम राहणार आहे.
कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत कोरोनाशी लढण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे. याचदरम्यान, जिल्'ातील ग्रामपंचायतींच्यादेखील निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होता. निवडणुकीच्या निमित्ताने होणारी गर्दी तसेच सभा, मेळाव्यांमुळे गर्दीची शक्यता गृहित धरून निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. आहे त्या टप्प्यावर निवडणुकीचे कामकाज थांबविण्यात आलेले आहे.