कांदे नव्हे, बटाटे महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 11:18 PM2020-12-04T23:18:19+5:302020-12-05T00:20:23+5:30

सायखेडा : ग्रामीण भागातील गावागावात भरणाऱ्या आठवडे बाजारात भाज्यांचे भाव गडगडले असून, शेतकऱ्यांना भाज्या मातीमोल भावात विक्री कराव्या लागत ...

Potatoes are more expensive than onions | कांदे नव्हे, बटाटे महागले

कांदे नव्हे, बटाटे महागले

Next
ठळक मुद्देभाजीपाला गडगडला : आठवडे बाजारात भाज्या मातीमोल

सायखेडा : ग्रामीण भागातील गावागावात भरणाऱ्या आठवडे बाजारात भाज्यांचे भाव गडगडले असून, शेतकऱ्यांना भाज्या मातीमोल भावात विक्री कराव्या लागत आहेत . सद्या केवळ बटाटे ५० रुपये किलो दराने विक्री होत असल्यामुळे बटाट्याचे महत्त्व वाढले आहे. कांद्याच्या भावापेक्षा दुप्पट भाव बटाट्याला मिळत असल्यामुळे कांद्यापेक्षा बटाटे अनेक वर्षांनंतर महाग झाले आहेत.

ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस पडला होता, तेव्हा शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र सोयाबीन, मका आणि खरीप हंगामातील पिके काढल्यावर सर्वच शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली, जे शेतकरी कधीच भाजीपाला करत नव्हते. त्यांनीसुद्धा भाजीपाला लागवड केली, त्यामुळे पिकांचे क्षेत्र वाढले शिवाय कांदा रोपांची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतात काय लागवड करावी, असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून भाजीपाला लागवड केली. भाजीपाल्याच्या क्षेत्रात वाढ झाली. त्याचा फटका आज नगदी पिकाला बसत आहे.

पालेभाज्या कोणत्याही घेतल्यातरी अवघ्या पाच रुपये दरात इतकी स्वस्त जुडी मिळते, कोथिंबीर, शेपू, मेथी, पालक ५ रुपये जुडी तर वेलवर्गीय पालेभाज्या अवघ्या १० रुपये प्रतिकिलो दराने विकत आहेत. बटाटे आणि लसूण मात्र चांगला भाव खात आहे. ही दोन्ही पिके सध्या दुसऱ्या राज्यातून येत आहे. येणारा सर्व बटाटा आणि लसूण दुसऱ्या भागातून येत असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा सर्व शेतमाल बेभावात विक्री करावा लागत आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळे आठवडे बाजारात किरकोळ विक्री केल्यास चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आठवडे बाजारातदेखील भाजीपाला कवडीमोल भावात विक्री होत असल्यामुळे खर्चदेखील वसूल होत नाही.

- युवराज कोटकर, शेतकरी, करंजगाव

Web Title: Potatoes are more expensive than onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.