'संभाव्य पाणीटंचाईचे नाशिकमध्ये गावपातळीवर ‘मायक्रो प्लॅनिंग’ हवे'

By अझहर शेख | Published: April 8, 2023 02:23 PM2023-04-08T14:23:45+5:302023-04-08T14:24:31+5:30

पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आदेश

Potential water scarcity needs micro planning at village level in Nashik dada bhuse | 'संभाव्य पाणीटंचाईचे नाशिकमध्ये गावपातळीवर ‘मायक्रो प्लॅनिंग’ हवे'

'संभाव्य पाणीटंचाईचे नाशिकमध्ये गावपातळीवर ‘मायक्रो प्लॅनिंग’ हवे'

googlenewsNext

नाशिक : ‘अल निनो’च्या प्रभावामुळे जलसाठे वेगाने खालावण्याची श्यक्यता हवमान खात्याने वर्तविली आहे. यामुळे जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई भासू शकते. याबाबत जिल्हा प्रशासनाने आतापासूनच त्या परिस्थितीविषयीचे प्रत्येक गावपातळीवर ‘मायक्रो प्लॅनिंग’ करावे, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. पिण्याच्या पाण्याला अधिकाधिक प्राधान्य दिले जावे. शहरासह जिल्ह्यातील गावांमध्येही पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आतापासूनच जनप्रबोधनावर भर द्यावा, अशी सुचनाही त्यांनी यावेळी बैठकीत केली.

शनिवारी (दि.८) दादा भुसे हे नाशिक शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद, जलसंपदा विभागाच्या विविध अधिकाऱ्यांसोबत संभाव्य पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी दादा भुसे म्हणाले, पाणी टंचाईचे नियोजन करताना ते गावपातळीवरचे असावे. यासाठी ग्रामपंचायत सदस्यांपासून तर खासदारांसह सर्व लोकप्रतिनिधींना प्रशासनाने विश्वासात घ्यावे. त्या माध्यमातून नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करण्यात यावे. त्याचप्रमाणे ज्या भागातील पाणी पुरवठा योजनांची कामे अंतीम टप्प्यात पोहचलेली आहेत, ती कामे तातडीने पूर्ण करावे, अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. त्यासाठी सर्व प्रांताधिकारी यांनी संबंधित विभागांच्या स्थानिक पातळीवर बैठका घेवून आवश्यकेनुसार नियोजन करण्याचे आदेश दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, उमेश वावरे, अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते यांच्यासह विविध प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. पुलकुंडवार, डॉ. गुंडे व शिंदे यांनी पाणी टंचाईबाबत केलेल्या नियोजनाची माहिती दृकश्राव्य यंत्राद्वारे सादर केली.

जंगलातील पाणवठे कोरडेठाक नको!
माणसांसह वन्यप्राण्यांच्याही पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यावर भर द्यावा. वनविभागाने यासाठी त्यांच्या वनक्षेत्रातील वनतळ्यांची तातडीने दुरूस्ती करावी, तसेच सर्व पाणवठे अद्ययावत करुन आवश्यकतेनुसार नव्याने काही पाणवठे तयार करावेत, मात्र हे पाणवठे कोरडेठाक राहणार नाही, याची काळजी घ्यावी, संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तशा सुचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन कराव्यात, असही दादा भुसे म्हणाले. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, याचा विसर प्रशासनाने पडू देऊ नये.

अधिकाऱ्यांनी ‘फिल्ड’ दौरा करावा
जिल्ह्यात टंचाई काळात गावपातळीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम मिळेल, यासाठी आतापासूनच प्रयत्न करायला हवेत. यासाठी अधिकारी यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जावून पाहणी करावी. तसेच नादुरूस्त कुपनलिकांची कामे ‘मिशन मोड’वर घेवून तातडीने दुरूस्त करत कुपनलिका अद्ययावत कराव्यात. शहरासह ग्रामिण भागात पाण्याचा अपव्यव होणार नाही यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर अधिकाधिक भर आतापासून द्यायला हवात, अशी सुचनाही त्यांनी केली.

Web Title: Potential water scarcity needs micro planning at village level in Nashik dada bhuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक