कोरोनानंतर आता संभाव्य झिका व्हायरसचा धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:22+5:302021-07-18T04:11:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : देशात झिका व्हायरसचा शिरकाव झाला असून, केरळमध्ये या व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून ...

Potential Zika virus threat after corona! | कोरोनानंतर आता संभाव्य झिका व्हायरसचा धोका !

कोरोनानंतर आता संभाव्य झिका व्हायरसचा धोका !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : देशात झिका व्हायरसचा शिरकाव झाला असून, केरळमध्ये या व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला होता. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली-मुंबईसह विमानतळांनी जोडले गेलेल्या अन्य महानगरांनादेखील दक्षतेचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळेच कोरोनाबाबतच्या चाचण्यांमध्ये किंवा त्यानंतरही दक्षता ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

देशात कोरोना प्रादुर्भावात आणखी एका व्हायरसनं चिंता वाढवली आहे. तो म्हणजे, झिका व्हायरस. केरळमध्ये एका गर्भवती महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याच पार्श्वभूमीवर केरळमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच दिल्लीहून तत्काळ तज्ज्ञांचं एक विशेष पथक केरळसाठी रवाना झाले होते. आतापर्यंत केरळमध्ये जवळपास १८ लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. केरळ दौऱ्यावर असलेल्या दिल्ली एम्सच्या पथकानं झिका व्हायरसबाबत देशातील इतर राज्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. केरळच्या शेजारील राज्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच केरळसह सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्रातदेखील झिकाबाबत सर्व स्तरावर दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

इन्फो

डास चावल्याने होतो आजार

डास चावल्यानं होणाऱ्या या आजाराचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला होता. परंतु, त्यानंतर अवघ्या दोन दिवसात या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. या व्हायरसमुळेे राज्यांसोबत केंद्र सरकारच्याही चिंतेत भर पडली आहे. महिलेला लागण झाल्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने अजून १३ नमुन्यांची चाचणी केली होती. त्यानंतर या १३ व्यक्तिंनाही झिका व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. ४८ तासांत १४ रुग्णांना झिका व्हायरसची लागण झाली आहे. हा आजार जीवघेणा नसला तरी त्याचं लवकर निदान होऊन उपचार सुरू होणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांचे म्हणणे आहे.

इन्फो

झिका व्हायरसचा प्रसार

झिका व्हायरसचा प्रसार हा एडीस प्रकारचा डास चावल्याने होतो. एडीस प्रकारच्या डासामुळे डेंग्यू, चिकुन गुन्या आणि पिवळा ताप असे आजारही होतात. झिका व्हायरसचा प्रसार गर्भवती महिलेला झाल्यास तिच्या गर्भातही या व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याबाबत अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या रोगाचा प्रसार साधारणपणे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय क्षेत्रात होतो. एडीस प्रकारातील डास हा शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी चावतो. जगातील अनेक देशांमध्ये या प्रकाराचे डास आढळतात.

इन्फो

या आजाराची लक्षणे

ताप येणं, त्वचेवर चट्टे पडणं, सांधेदुखी ही झिका व्हायरसची प्राथमिक लक्षणं आहेत. डोकेदुखी, अस्वस्थता असे लक्षणंही होऊ शकतात. ही लक्षण सामान्यपणे दोन ते सात दिवसांपर्यंत कायम राहतात. सध्या झिका व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही औषध वा लस उपलब्ध नाही. डास चावण्यापासून संरक्षण करणे हाच सर्वात मोठा उपाय सध्या आपल्याकडे आहे. त्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे किंवा डास होऊ नयेत यासाठी उपाययोजना करणे या गोष्टीमुळे मोठा परिणाम होऊ शकतो.

इन्फो

समान लक्षणांमुळे दक्षता

ताप, अंगावर पुरळ उठणं, अंगदुखी, सांधेदुखी आणि डोकेदुखी ही झिका व्हायरसची लक्षणे आहेत. त्यातील काही लक्षणे ही कोरोनाचीदेखील आहेत. केरळमधील रुग्णांना ही लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पण त्यांना कोरोना नसल्याचं दिसून आल्यानंतर वेगळी चाचणी करण्यात आली. त्यातून त्यांना झिकाची लागण झाल्याचे दिसून आल्याने सर्वत्र दक्षता आणि काटेकोर चाचण्यांबाबत आग्रही राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डॉ. कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी

------------------------

ही डमी आहे.

Web Title: Potential Zika virus threat after corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.