उष्ण हवामानामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 07:02 PM2019-04-01T19:02:48+5:302019-04-01T19:02:57+5:30
खामखेडा : बदलत्या हवामानाचा व वाढत्या उष्म्यामुळे पोल्ट्रीफार्ममधील पक्षी मृत्युमुखी पडत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फॉर्म शेड रिकामे होत असल्याचे पाहवयास मिळत आहे.
खामखेडा : बदलत्या हवामानाचा व वाढत्या उष्म्यामुळे पोल्ट्रीफार्ममधील पक्षी मृत्युमुखी पडत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फॉर्म शेड रिकामे होत असल्याचे पाहवयास मिळत आहे.
गेल्या वीस वर्षांपासून शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून गायी, म्हशी, बकरी, म्हणजे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत आहे. त्याचबरोबर या पोल्ट्री बांधकामासाठी मोठया प्रमाणात खर्च येतो. परंतु या पोल्ट्री शेड उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. परंतु यासाठी गावातील सोसायटी, बँक आदी कर्ज देऊ लागल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुले नोकरीऐवजी पोल्ट्री व्यवसायाकडे वळल्याचे दिसून येत आहे.
या पोल्ट्री व्यवसाय अनेक कंपन्या कोंबडीचे पिल्ले त्यांच्यासाठी लागणारे खाद्य आदी पुरवितात. वेळच्यावेळी कंपनीचे डॉक्टर या पोल्ट्री शेडला भेटी देऊन पिलांची देखभाल करतात. पोल्ट्री मालकाने पिलांना दररोज पाणी, खाद्य आदी संगोपन करावे लागते. याच्या मोबदल्यात पोल्ट्री मालकाला प्रतिकिलोमागे विशिष्ट कमिशन दिले जाते. तसेच सध्या पशुधन कमी झाल्याने शेतीसाठी शेणखत मिळत नाही. तेव्हा या पोल्ट्रीमुळे संगोपन म्हणून कोंबडी खत मिळते. पैसाही मिळतो आणि शेतीसाठी खतही मिळते.
परंतु चालू वर्षी वातावरणामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. उष्ण हवामानामुळे कोंबड्या मोठ्या प्रमाणात मृत्यू पडत आहे. या उष्ण हवामानाचा कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या पत्र्यावर उसाचे पाचट, बारदान, नाराळाच्या झाडाच्या फांद्या आदी टाकले जाऊन उष्ण वातावरणापासून रक्षण केले जात आहे. एवढेही करून या वर्षाचे वातावरण पोल्ट्री व्यवसायासाठी पोषक नाही. यामुळे पोल्ट्रीवाल्यांनी पोल्ट्री शेडमध्ये पिल्ले न टाकल्याने अनेक पोल्ट्री शेड रिकामे दिसून येत आहेत.
प्रतिक्रि या : पोल्ट्री व्यवसायासाठी जास्त उष्ण किवा जास्त ठंड हवामान लागत नाही. यासाठी दमट हवामान पोषक असते. परंतु चालू वर्षी मार्च महिन्यात उष्ण वातावरण पोल्ट्री व्यवसाय कसा करावा, याची चिंता लागलेली असल्याने पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे.
नितिन शेवाळे, पोल्ट्री धारक
(फोटो ०१ खामखेडा)उन्हापासून पोल्ट्री फार्मवर नारळाच्या फांद्या टाकून पोल्ट्रीतील कोंबडीच्या संरक्षण केले जात आहे.