उष्ण हवामानामुळे पोल्ट्री व्यवसाया धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 05:58 PM2019-04-01T17:58:29+5:302019-04-01T17:59:33+5:30

खामखेडा : बदलत्या हवामानाचा व वाढत्या उष्ण वातारणामुळे पोल्ट्री फार्म मघील पक्षी मरत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फॉर्म शेड रिकामे होत असल्याचे पाहवयास मिळत आहे.

Poultry business risk due to hot weather | उष्ण हवामानामुळे पोल्ट्री व्यवसाया धोक्यात

उन्हापासून पोल्ट्री फार्मवर नारळाच्या फांद्या टाकून पोल्ट्रीतील कोंबडीच्या संरक्षण केले जात आहे.

Next
ठळक मुद्दे पोल्ट्रीमुळे संगोपन म्हणून कोंबडी खत मिळते. पैसाही मिळतो आणि शेतीसाठी खतही मिळते.

खामखेडा : बदलत्या हवामानाचा व वाढत्या उष्ण वातारणामुळे पोल्ट्री फार्म मघील पक्षी मरत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फॉर्म शेड रिकामे होत असल्याचे पाहवयास मिळत आहे.
गेल्या वीस वर्षापुर्वी शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून गायी, म्हशी, बकरी, म्हणजे दूध व्यवसाय मोठया प्रमाणात करीत आहे. त्याच बरोबर गावठी कोंबड्याही मोठया प्रमाणात पाळीत आहे, परंतु शेतीच्या विकास होत गेल्याने या शेतीपुरक जोड धंद्यामघ्ये वाढ झाल्याने दुय्यम दर्जाचे व्यवसाय गरज भासू लागल्याने, शेतकरी वेगवेगळ्या व्यवसात साधन बनू लागल्याने शेतकरी मोठया प्रमाणात पोल्ट्री व्यवसायाकडे वळु लागल्याने खामखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात पोल्ट्रीच्या शेडघ्ये वाढ झाली आहे. या पोल्ट्री बांधकामासाठी मोठया प्रमाणात खर्च येतो. परंतु या पोल्ट्री शेड उभारणीसाठी मोठया प्रमाणात खर्च येतो. परंतु यासाठी गावातील सोसायटी, बँक आदी कर्ज देऊ लागल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या सुशिक्षीत मुले नोकरी ऐवजी पोल्ट्री व्यवसायाकडे वळल्याचे दिसून येत आहे.
या पोल्ट्री व्यवसाय अनेक कंपनी कोबडीचे पिल्ले त्यांच्यासाठी लागणारे खाद्य आदि पुरवितात. वेळच्यावेळी कंपनीचे डॉक्टर या पोल्ट्री शेडला भेटी देऊन पिल्याची देखभाल करीतात. पोल्ट्री मालकाने पिल्याना दररोज पाणी, खाद्य आदि सगोंपन करावे लागते. याच्या मोबदल्यात पोल्ट्री मालकाला प्रति किलो मागे विशिष्ट कमिशन पैसे दिले जाते. तसेच सघ्या पशुधन कमी झाल्याने शेतीसाठी शेणखत मिळत नाही. तेव्हा या पोल्ट्रीमुळे संगोपन म्हणून कोंबडी खत मिळते. पैसाही मिळतो आणि शेतीसाठी खतही मिळते.
परंतु चालु वर्षी वातावरणामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. उष्ण हवामानामुळे कोंबडीचा मृत्य मोठया प्रमाणात होतो. या उष्ण हवामानाचा कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या पत्र्यावर ऊसाचे पाचट, बारदान, नाराळाच्या झाडाच्या फांद्या आदी टाकले जाऊन उष्ण वातावरणापासून रक्षण केले जाते. एवढेही करून या वर्षाचे वातावरण पोल्ट्री व्यवसायासाठी पोषक नाही. यामुळे पोल्ट्रीवाल्यांनी पोल्ट्री शेडमघ्ये पिल्ले न टाकल्याने अनेक पोल्ट्री शेड रिकामे दिसून येत आहेत. त्यामुळे बॉयलर कोंबडीच्या मटनच्या भावात वाढ झालेली दिसून येत आहे.
प्रतिक्रि या : पोल्ट्री व्यवसायासाठी जास्त उष्ण किवा जास्त ठंड हवामान लागत नाही. यासाठी दमट हवामान पोषक असते. परंतु चालू वर्षी मार्च महिन्यात उष्ण वातावरण पोल्ट्री व्यवसाय कसा करावा याची चिंता लागलेली असल्याने पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे.
नितिन शेवाळे, पोल्ट्री धारक

Web Title: Poultry business risk due to hot weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.