नायलॉन मांजाने कापला पोल्ट्री व्यवसायीकाचा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 08:56 PM2019-01-28T20:56:51+5:302019-01-28T20:57:22+5:30
लासलगाव : लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथील पोल्ट्री व्यावसायिकाचा गळा नायलॉन मांजाने कापला गेला अजून थोडीशी जखम जास्त झाली असती तर त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता त्यामुळे नायलॉन मांजा वापरावर कठोर निर्बंध आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
लासलगाव : लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथील पोल्ट्री व्यावसायिकाचा गळा नायलॉन मांजाने कापला गेला अजून थोडीशी जखम जास्त झाली असती तर त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता त्यामुळे नायलॉन मांजा वापरावर कठोर निर्बंध आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
नायलॉन मांजावर बंदी असतानाही सर्रास नायलॉन मांजाचा वापर पतंग उडविण्यासाठी केला जाता,े या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली तरी तो सर्वत्र वापरला जात आहे.
लासलगाव जवळच असलेल्या पिंपळगाव नजीक येथे पोपट कारभारी पवार हे पोल्ट्री व्यावसायिक असून लासलगाव येथून काम आटपून ते आपल्या घरी पिंपळगाव नजीक येथे जात असताना रस्त्यात काही मुले पतंग उडवीत होत,े त्या पतंगाचा मांजा त्यांच्या जाळ्यात अडकून त्यांची मान कापली गेल्याने ते बेशुद्ध पडले त्यांना जवळच असलेल्या श्याम मोरे व गणेश नेटारे यांनी सोनवणे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
डॉक्टर सोनल सोनवणे यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार करत मानेला आठ टाके घालत त्यांचे प्राण वाचवले. अत्यंत खोलवर मांजाची जखम झाली होती. अजून थोडी जखम वाढली असती तर त्यांना प्राण गमवावे लागले असते, असे यावेळी डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान नायलॉन मांजाचा वापरावर बंदी घालण्यात आली असतांनाही सर्रास वापरला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिस व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी याकडे का दुर्लक्ष्य करत आहेत, याबाबत नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (फोटो २८ मांज्या)