वादळी वाऱ्याने खेडला पोल्ट्री शेड कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 10:23 PM2021-06-21T22:23:25+5:302021-06-22T00:13:44+5:30
सर्वतिर्थ टाकेद : खेड (ता. इगतपुरी) येथील शेतकरी व पोल्ट्री व्यावसायिक चंद्रकांत किसन वाजे यांचे पोल्ट्री शेड रविवारी (दि.२०) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वारा व पाऊस झाल्याने कोसळले. यावेळी पोल्ट्रीची देखरेख करणारा प्रसंगावधान दाखवत बाहेर पडल्याने तो बचावला.

चंद्रकांत वाजे यांनी दोन ते अडीच वर्षांपूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून त्यांच्या मळ्यात १०० बाय ३० चे पोल्ट्री शेड बांधले होते. त्यामध्ये तीन हजार ब्रॉयलर कोंबड्या होत्या. या कोंबड्या दोन ते तीन दिवसांत त्या बाजारात विकण्यासाठी पाठवणार होते. मात्र, वादळी वाऱ्याने भिंती व पत्रे कोंबड्यावर कोसळल्याने साधारण अडीच हजार कोंबड्या पडलेल्या शेडखाली दबल्या जावून मृत्यूमुखी पडल्या आहेत. त्यात शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
पोल्ट्री शेड जमीनदोस्त झाल्याने यातील पक्ष्यांना खाद्य देण्यात येणारे साहित्य, पाईपलाइन, लोखंडी जाळी, पक्षी खाद्य आदी साहित्याचे नुकसान झाले आहे.
बाळू कचरे, पोलीस पाटील अंकुश वाजे, सखाराम वाजे, संदीप मालुंजकर, व्यंकटेश्वरा हॅचेरी कंपनीचे स्वप्निल मोरे, हेमराज भामरे आदी ग्रामस्थांनी पाहणी करून शासनाने दखल घेऊन पोल्ट्री व्यावसायिकाला मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.