मानोरी येथे पोल्ट्रीचे वादळाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:31 AM2019-05-03T00:31:43+5:302019-05-03T00:35:37+5:30

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी येथे गुरु वारी (दि.२) दुपारी अचानक आलेल्या वादळाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री व शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

Poultry storm damages at Manori | मानोरी येथे पोल्ट्रीचे वादळाने नुकसान

मानोरी येथे पोल्ट्रीचे वादळाने नुकसान

Next
ठळक मुद्देअंदाजे दोन लाख रु पयांचे नुकसान

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी येथे गुरु वारी (दि.२) दुपारी अचानक आलेल्या वादळाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री व शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
मानोरी - पळसखेडे रस्त्यालगत म्हस्के वस्तीजवळ मच्छींद्र शिवराम पवार यांची शेतजमीन आहे. शेतगट नंबर ६०४ मध्ये दीड महिन्यापूर्वीच त्यांनी कुक्कुटपालनासाठी पोल्ट्री शेडचे बांधकाम केले होते. येथे पत्र्याच्या शेडचे कामही करण्यात आले होते. गुरु वारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळाने पवार यांच्या पोल्ट्रीशेडच्या सिमेंट पत्र्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही पत्रे तुटून पडले तर काही लांब अंतरावर जाऊन पडले. अचानक वादळाने उग्र रूप धारण केल्याने शेडचे संपूर्ण पत्रे उडून या शेतकºयाचे नुकसान झाले आहे. शेजारील शेतकºयांनी पवार यांना भ्रमणध्वनीवरु न घटनेची माहिती दिली. वादळात पवार यांचे अंदाजे दोन लाख रु पयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Poultry storm damages at Manori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक