वीजप्रश्नी आक्रमक : राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प; पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:13 AM2017-11-17T00:13:02+5:302017-11-17T00:14:02+5:30
नांदगावी शेतकºयांचा रास्ता रोको नांदगाव : वीजप्रश्नी तालुक्यातील पिंप्राळे वाखारी येथील शेतकºयांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे नांदगाव - मनमाड राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, वीज वितरण विभागाकडून थातूरमातूर उत्तर देत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले गेले. या पार्श्वभूमीवर वेळ झाल्याने व रहदारी जाम झाल्याने तोंडी आश्वासनावर आंदोलकांनी रस्ता सोडला.
नांदगावी शेतकºयांचा रास्ता रोको
नांदगाव : वीजप्रश्नी तालुक्यातील पिंप्राळे वाखारी येथील शेतकºयांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे नांदगाव - मनमाड राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, वीज वितरण विभागाकडून थातूरमातूर उत्तर देत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले गेले. या पार्श्वभूमीवर वेळ झाल्याने व रहदारी जाम झाल्याने तोंडी आश्वासनावर आंदोलकांनी रस्ता सोडला.
माजी नगरसेवक शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, बापूसाहेब कवडे यांनी भेट दिली. अर्धवट योजना बनवून शेतकºयांची सत्त्वपरीक्षा पाहणारी वस्तुस्थिती येथील रास्ता रोको आंदोलनात समोर आल्याने वीज वितरण विभागाचे पितळ उघडे पडले. थकबाकीचे कारण पुढे करून वीज पुरविण्याचे नाकारणाºया विभागाला एकही रुपया थकबाकी नसली तरी पूर्ण दाबाने वीजपुरवठा करू शकणार नाही याची कबुली द्यावी लागली. रब्बी हंगाम सुरू झाला असून, कांदा, गहू व इतर पिकांची लागवड सुरू आहे. विहिरींना पाणी आहे. मात्र २४ तासांत एक ते दोन तासच तो ही कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतकरीवर्गापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे संतप्त पिंप्राळे, वाखारी, हिंगणवाडी व इतर गावांच्या शेतकºयांनी रास्ता रोको केला. रजेवर गेलेल्या साळुंके यांच्या उपकार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त भार अशोक येवला यांच्याकडे असल्याने ते व सहाय्यक अभियंता गायत्री चव्हाण यांना आंदोलकांच्या रोषास सामोरे जावे लागले. शिवाजी पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष प्रदीप कासलीवाल यांनी दररोज किमान आठ तास अखंडित वीजपुरवठ्याची मागणी केली.
वीज वितरण विभागाकडून बाजू मांडताना येवला व चव्हाण यांनी संजीवनी कृषी योजनेतील बिलाची रक्कम न भरणाºया शेतकरी ग्राहकाचा पुरवठा बंदच ठेवू तसेच बिले भरल्यानंतरही अखंडित वीजपुरवठ्याचे ठोस आश्वासन देऊ शकत नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला.
यावेळी शेतकºयांना बिल भरण्यासाठी काही दिवसांची मुदत द्या. त्यानंतर ज्यांच्याकडे बाकी असेल ते वगळून इतराना सलग आठ तास वीजपुरवठा द्या, अशी मागणी पाटील व कासलीवाल यांनी केली. अधिकाºयांना फटकारलेशेतकºयांचे रास्ता रोको आंदोलन सुरू असल्याची माहिती शिवसेना कार्यालयात पोहचताच आंदोलनाच्या ठिकाणी जिल्हाप्रमुख सुहास कांदे, बापूसाहेब कवडे, तालुकाप्रमुख राजेंद्र जगताप, नगरसेवक किरण देवरे, बाजार समिती सभापती तेज कवडे, माजी सभापती विलास अहेर, एकनाथ सदगिर आदी आंदोलनप्रसंगी दाखल झाले. कांदे यांनी आक्र मक भूमिका घेऊन वीज वितरणाच्या प्रतिनिधींना शिवसेना स्टाइलने फटकारले.
याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, नगरसेवक वाल्मीक टिळेकर आदी दाखल झाले व त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला.