पावसाच्या सरी कोसळताच वीज विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:24 AM2019-06-12T00:24:15+5:302019-06-12T00:25:49+5:30
पंचवटी : सोमवारी सायंकाळी पावसाने काहीकाळ हजेरी लावताच संधी साधणाऱ्या वीज कंपनीने संपूर्ण हिरावाडी परिसराचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे रात्री ११ वाजेनंतरदेखील सुरळीत न झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. वीजपुरवठा सुरुळीत करण्याबाबत कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, तेथून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून शेकडो ग्राहकांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
पंचवटी : सोमवारी सायंकाळी पावसाने काहीकाळ हजेरी लावताच संधी साधणाऱ्या वीज कंपनीने संपूर्ण हिरावाडी परिसराचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे रात्री ११ वाजेनंतरदेखील सुरळीत न झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. वीजपुरवठा सुरुळीत करण्याबाबत कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, तेथून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून शेकडो ग्राहकांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना ‘बिजली गूल’चा फटका सहन करावा लागल्याने आगामी काळात वीजवितरण कंपनी ग्राहकांना असेच वेठीस धरणार का? असा सवाल केला जात आहे.
हिरावाडी परिसरातील बनारसीनगर, शक्तीनगर, भगवतीनगर, अभिजितनगर, शिवकृपानगर, पाटकिनार परिसर भागात रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरले होते. नागरिकांच्या घरातील बिजली गूल होण्यापाठोपाठ मुख्य रस्त्यावर असलेले पथदिवेदेखील बंद असल्याने किर्रर्र अंधार पसरलेला होता.
नाशिकनाशिकरोडच्या अनेक भागात अंधाररोडच्या अनेक भागात अंधारनाशिकरोड : गेल्या शनिवारपासून पहिल्या पावसात विजेचा सुरू झालेला खेळखंडोबा अजूनही सुरूच आहे. विशेष म्हणजे नाशिकरोडच्या अनेक भागात रात्रीच्या सुमारास वीज गायब होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे.
पावसाच्या कालावधीत दरवर्षी विद्युत रोहित्र तसेच वीज वाहिन्यांमध्ये बिघाड होत असल्याने वीजपुरवठा खंडित होत असतो त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो वीज वितरण कंपनीने पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे असले तरी पावसाळ्याच्या पहिल्या दुसºया दिवसापासूनच वीजपुरवठा खंडित होत असल्याने आगामी कालावधीत वीज वितरण कंपनी वारंवार वीजपुरवठा खंडित करून ग्राहकांना अशाप्रकारे अंधारात ठेवणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
तक्रार क्रमांक बिझी
परिसरातील वीज खंडित झाली किंवा विद्युत रोहित्रात बिघाड झाल्यास वीज वितरण कंपनीकडे तक्रार नोंदविण्यासाठी वीज वितरण कंपनीने ग्राहकांना एका मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे; मात्र सदरचा क्रमांक सतत बिझी येत असल्याने नागरिकांना संताप व्यक्त करावा लागला. वीजवितरण कंपनीने सदरचा मोबाइल क्रमांक पंचवटी परिसरातील तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहकांना उपलब्ध करून दिलेला असला तरी अत्यावश्यक वेळी सदर क्रमांक सतत बिझी दाखवित असल्याने ग्राहकांना वारंवार नंबर डायल करावा लागला. अखेर फोन लागलाच नाही.