रतन इंडिया औष्णिक प्रकल्पातून लवकरच वीजनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 01:55 AM2022-05-06T01:55:21+5:302022-05-06T01:55:48+5:30

केंद्र सरकारचे एनटीपीसी पथक गेल्या तीन दिवसांपासून सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्प व परिसराची पाहणी करत आहे. रेल्वे, रस्ते मार्ग याद्वारे होणारी कोळसा वाहतूक ही सोईस्कर होणार असल्याने या प्रकल्पाबाबत त्यांनी अनुकूलता दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच रतन इंडिया प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Power generation from Ratan India thermal plant soon | रतन इंडिया औष्णिक प्रकल्पातून लवकरच वीजनिर्मिती

सिन्नर येथील रतन इंडिया औष्णिक वीज प्रकल्प.

googlenewsNext
ठळक मुद्देशुभ संकेत : केंद्र सरकारच्या एनटीपीसी पथकाकडून तीन दिवस पाहणी

सिन्नर : केंद्र सरकारचे एनटीपीसी पथक गेल्या तीन दिवसांपासून सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्प व परिसराची पाहणी करत आहे. रेल्वे, रस्ते मार्ग याद्वारे होणारी कोळसा वाहतूक ही सोईस्कर होणार असल्याने या प्रकल्पाबाबत त्यांनी अनुकूलता दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच रतन इंडिया प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. ५४० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात दोन वेळेस ऊर्जामंत्री, संबंधित विभागाच्या सचिव व इंडिया बुल्सच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील रतन इंडियाचा औष्णिक वीज प्रकल्प सुरू करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार माणिकराव कोकाटे यांनी १,३५० मेगावॅटचा औष्णिक वीज प्रकल्प सुरू झाला, तर या भागात रोजगाराच्या संधी वाढण्याबरोबरच २० किमी परिघातील शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा होऊ शकतो, अशी माहिती देत हा वीज प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाजनकोच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्याच्या सूचना केल्या, तर महाजनको व महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाकडे यात लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारचे एनटीपीसी पथक गेल्या तीन दिवसांपासून सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्प व परिसराची पाहणी करत आहे. रेल्वे मार्ग, रस्ते मार्ग याद्वारे होणारी कोळसा वाहतूक ही सोईस्कर होणार असल्याने या प्रकल्पाबाबत अनुकूलता दर्शवीत त्यांनी केंद्र सरकारला तात्काळ अहवाल पाठवला आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंह यांनीही त्यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. प्रत्येकी २७० मेगावॅटचा एक, असे ५४० मेगावॅटचे दोन युनिट सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित कामे होऊन महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या एनटीपीसी विभागाच्या माध्यमातून वीजनिर्मिती होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

 

इन्फो

 

प्रकल्प मालकांची दूरस्थ प्रणालीद्वारे हजेरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीसाठी या प्रकल्पाचे मालक राजीव रतन हे दूरस्थ प्रणालीद्वारे हजर होते. त्यांनी हा प्रकल्प चालविण्याची आर्थिक क्षमता कंपनीची राहिली नसल्याने कोकाटे यांनी सुचविल्याप्रमाणे सरकारी भागीदारीत हा प्रकल्प सुरू करण्याची विनंती पवार यांच्याकडे केली होती. शिवाय रतन इंडियाचे अधिकारी राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोकाटे यांना या प्रकल्पातून वीजनिर्मिती होण्यामागील अडथळे सांगून त्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचीही माहिती दिली होती. अखेर सर्वांच्या परिश्रमाची फलनिष्पत्ती झाली आहे.

इन्फो

 

२५ हजार रोजगार उपलब्ध होणार

 

सदर प्रकल्प सुरू झाल्यास पुरेशी वीज उपलब्ध होईल. त्यातून नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील विशे करून नाशिक जिल्ह्यातील कारखानदारी वाढीस लागेल. सिन्नर तालुक्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष, असे २५ हजार रोजगार उपलब्ध होतील. त्यामुळे बेरोजगारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

 

Web Title: Power generation from Ratan India thermal plant soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.