वीज उपकरणनिर्मिती उद्योगाचा विस्तार मेक इन नाशिकला बळ : एबीबीच्या नवीन कारखान्याचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:08 AM2018-01-20T01:08:21+5:302018-01-20T01:09:10+5:30

नाशिक : कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने एबीबीने नशिकमध्ये उद्योग विस्तार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीचे भारतातील व्यावस्थापकीय संचालक संजीव शर्मा यांनी सांगितले.

Power Generation Industry Extension: Make In Nashik Powerful: Opening of new ABB factory | वीज उपकरणनिर्मिती उद्योगाचा विस्तार मेक इन नाशिकला बळ : एबीबीच्या नवीन कारखान्याचे उद्घाटन

वीज उपकरणनिर्मिती उद्योगाचा विस्तार मेक इन नाशिकला बळ : एबीबीच्या नवीन कारखान्याचे उद्घाटन

Next
ठळक मुद्दे‘मेक इन नशिक’च्या अभियानाला बळ औद्योगिक मरगळ दूर होण्यास सुरुवात

नाशिक : औद्योगिक क्षेत्रात उद्योग विस्तारासाठी पोषक वातावरण असून, येथे उद्योग विकासासाठी आवश्यक वातावरणासोबतच कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने एबीबीने नशिकमध्ये उद्योग विस्तार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीचे भारतातील व्यावस्थापकीय संचालक संजीव शर्मा यांनी सांगितले. नााशिकमधील औद्योगिक वसाहतीत गेल्या ४० वर्षांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाची वीज उरकरणे बनविणाºया एबीबी कंपनीने नाशिकमधील वीज उपकरणनिर्मिती उद्योगाचा विस्तार केला असून, शुक्रवारी (दि. १९) कंपनीच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत एबीबीने ५ एकर क्षेत्रावर उभारलेल्या नवीन कारखान्याचे कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक संचालक संजीव शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळ एबीबी समूहाचे इलेक्ट्रिफिकेशन प्रॉडक्ट व्यवस्थापक मार्को टेलरिनी, मेटेओ केटी, एबीबी इलेक्ट्रिफिकेशन प्रोडक्ट इंडियाचे अध्यक्ष सी. पी.व्यास आदी उपस्थित होते. या नवीन कारखान्यामुळे ‘मेक इन नशिक’च्या अभियानाला बळ मिळाले असून, गेल्या अनेक वर्षांपासून नवीन गुंतवणूक येत नसल्याने औद्योगिक क्षेत्राला आलेली मरगळ दूर होण्यास सुरुवात झाली आहे. याप्रवेळी शर्मा यांनी नाशिकमध्ये कुलश मनुष्यबळ असल्यानेच कंपनीने येथे संशोधन व विकास केंद्रही सुरू केल्याचे सांगत त्यामुळेच नाशिकमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन होत आहे. एबीबीच्या एकूण उत्पादनापैकी नाशिक मधून सर्वाधिक १० ते १२ टक्के निर्यातक्षम उपकरणांची निर्मिती होते. नव्या कारखान्यामुळे हे प्रमाणे काही वर्षांतच २० ते २२ टक्के होण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली, तर कं पनीने आतापर्यंत बहुतांश स्थानिक मनुष्यबळास रोजगार देण्याचे धोरण राबवले असून, कंपनीच्या विस्तारामुळे स्थानिक नागरिकांना आणखी रोजगार उपलब्ध होणार असल्याचे कंपनीचे नाशिक युनिटचे प्रमुख गणेश कोठावदे यांनी दिली. परंतु कारखान्याचे उत्पादन मागणीनुसार वाढणार असल्याने मनुष्यबळातही टप्प्याटप्पयाने वाढ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नाशिकमध्ये प्रस्तावित असलेल्या केंद्रीय विद्युत संशोधन संस्थेचे (सीपीआरआय) केंद्र सुरू झाल्यास विद्युत उपकरण निर्मिती उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वासही कोठावदे यांनी व्यक्त केला.

Web Title: Power Generation Industry Extension: Make In Nashik Powerful: Opening of new ABB factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक