विजेचा लपंडाव; इंदिरानगरवासीय त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:20 PM2020-06-12T22:20:10+5:302020-06-13T00:11:09+5:30

इंदिरानगर : महावितरणकडून इंदिरानगर परिसरात होणारा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने या भागात विजेचा नेहमी लपंडाव सुरू असतो. त्यामुळे नागरिकांची घरघुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून, अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिकही त्रस्त झाले असून, या भागात स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Power outage; Indiranagar residents suffer | विजेचा लपंडाव; इंदिरानगरवासीय त्रस्त

विजेचा लपंडाव; इंदिरानगरवासीय त्रस्त

Next

इंदिरानगर : महावितरणकडून इंदिरानगर परिसरात होणारा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने या भागात विजेचा नेहमी लपंडाव सुरू असतो. त्यामुळे नागरिकांची घरघुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून, अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिकही त्रस्त झाले असून, या भागात स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
महावितरण कंपनीचे इंदिरानगर परिसरात स्वतंत्र सबस्टेशन झाल्यास सुमारे २५ वर्षांपासून सुरू असलेल्या विजेच्या लंबडावाचा प्रश्न सुटणार आहे. सध्या इंदिरानगर कक्ष कार्यालय अंतर्गत सुमारे पंचवीस हजार ग्राहक आहेत. भारतनगर सबस्टेशनमधून भारतनगर, शिवाजीवाडी विनयनगर, साईनाथनगर, दीपालीनगर, सूचितानगर, वडाळागाव, कमोदनगर, जयदीपनगरसह परिसरास विद्युत पुरवठा करण्यात येतो, तर पाथर्डी सबस्टेशनमधून वडाळागाव, इंदिरानगर मेहबूबनगर, समर्थनगर, सराफनगर, शरयूनगर, पांडवनगरी, कैलासनगर, सार्थकनगर, राजीवनगर, चेतनानगर, राणेनगर, श्री राजसारथी सोसायटी, रथचक्र सोसायटी, महारुद्र्र कॉलनी, अरुणोदय सोसायटीसह परिसराला विद्युत पुरवठा करण्यात येतो. इंदिरानगरच्या या भागात सुमारे दहा वर्षांपासून नियमित विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.



भारतनगर व पाथर्डी सब स्टेशनच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकवस्तीमुळे वीजग्राहकांची संख्याही वाढत असून, या दोन्ही उपकेंद्रांच्या क्षमतेपेक्षा अधिक विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे परिसरातीतल वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची प्रकार घडत असून पावसाळ्यात यात आणखीच भर पडत असल्याने इंदिरानगरवासीयांकडून परिसरासाठी स्वतंत्र सब स्टेशन सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
----------------------------
इंदिरानगर परिसरात वारंवार विजेच्या लपंडावामुळे अनेक नागरिकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतनगर व पाथर्डी सबस्टेशनवरील भार कमी करण्यासाठी इंदिरानगर परिसरात तत्काळ स्वतंत्र सबस्टेशन सुरू करण्याची गरज आहे. असे केल्यास या भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होऊ शकेल.
- रमिज पठाण, नागरिक, इंदिरानगर

Web Title: Power outage; Indiranagar residents suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक