वीजवाहक तारा तुटल्याने साडेसात तास वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 01:05 AM2021-01-04T01:05:21+5:302021-01-04T01:05:50+5:30

दोडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने सिन्नर केंद्रातून नांदूरशिंगोटेकडे येणाऱ्या ३३ के.व्ही.च्या मुख्य लाईनच्या वीज वाहक तारा रविवारी (दि. ३) सकाळी  तुटल्याने तब्बल साडेसात तास वीजपुरवठा खंडित होता. परिणामी, परिसरातील गावात सकाळपासून वीजपुरवठा नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.

Power outage for seven and a half hours due to power outage | वीजवाहक तारा तुटल्याने साडेसात तास वीजपुरवठा खंडित

दोडी शिवारातील दापूर रस्त्यालगत असणाऱ्या पोलवरील तुटलेले कंडक्टर तर दुसऱ्या छायाचित्रात वीजपुरवठा सुरळीत करतांना कंपनीचे कर्मचारी.

Next
ठळक मुद्देअज्ञात वाहनाची धडक  : ग्राहकात नाराजी

नांदूरशिंगोटे : दोडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने सिन्नर केंद्रातून नांदूरशिंगोटेकडे येणाऱ्या ३३ के.व्ही.च्या मुख्य लाईनच्या वीज वाहक तारा रविवारी (दि. ३) सकाळी  तुटल्याने तब्बल साडेसात तास वीजपुरवठा खंडित होता. परिणामी, परिसरातील गावात सकाळपासून वीजपुरवठा नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.
सिन्नर येथील वीज वितरण १३२ केव्ही केंद्रातून नांदूरशिंगोटे, दापूर, चास व दातली या उपकेंद्रांना ३३ केव्ही लाईन टाकण्यात आलेली आहे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दोडी गावाजवळील दोडी - दापूर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने वीज वाहक तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. 
तब्बल सात ते आठ तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने परिसरातील वीजग्राहकांना व व्यावसायिकांना मनस्ताप सहन करावा लागला. अज्ञान वाहनाने वीज वाहक तारा ओढत नेल्याने पंधरा वीज गाळे व दोन कंडक्टर तुटल्याने आपोआप वीज खंडित झाली. 
दरम्यान, सहायक उपअभियंता राहुल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वीज वितरण कंपनीचे १५ ते १६ कर्मचारी सकाळी दहा वाजेपासून घटनास्थळी व परिसरात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत 
आहेत. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला. 
याबाबत भगत यांनी घटनेची माहिती सिन्नर येथील वीज वितरण कार्यालयात तसेच वावी पोलीस ठाण्यात दिली 
आहे.
चारही उपकेंद्रातील गावांमध्ये सकाळपासून वीजपुरवठा नसल्याने ग्राहकांची चांगलीच अडचण निर्माण झाली होती. तसेच सर्वत्र लग्न सोहळे असल्याने त्यांनाही फटका बसला. तसेच हाॅटेल व्यावसायिक, इलेक्ट्रॉनिक दुकान, पीठ गिरणी,  मोबाईल दुकान, कापड दुकान तसेच छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागला. तसेच शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता आले नाही. वीजपुरवठा खंडित असल्याने पाणीपुरवठा योजनेलाही अडचण निर्माण झाली होती. 

Web Title: Power outage for seven and a half hours due to power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.