ग्रामीण भागात विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:31 AM2020-12-15T04:31:11+5:302020-12-15T04:31:11+5:30
------ जनावरे चोरीचे प्रकार वाढले मालेगाव : शेतीशिवारात बांधून ठेवलेली जनावरे अज्ञात चोरट्यांकडून चोरून नेले जात आहेत. रस्त्याकडेला व ...
------
जनावरे चोरीचे प्रकार वाढले
मालेगाव : शेतीशिवारात बांधून ठेवलेली जनावरे अज्ञात चोरट्यांकडून चोरून नेले जात आहेत. रस्त्याकडेला व गोठ्यात बांधलेली जनावरे चोरट्यांकडून लक्ष्य केली जात आहेत. जनावरांची तस्करी करणारी टोळी कार्यरत आहे. या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
------
रेशनचे धान्य खुल्या बाजारात
मालेगाव : सध्या शासनाकडून व रास्त दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जात आहे. शासनाने कोविड काळात मोफत व वाढीव धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या सहा महिन्यांपासून लाभार्थींना अन्नधान्याचे वाटप केले जात आहे; मात्र लाभार्थींकडे पुरेसा धान्यसाठा झाल्याने जमा झालेले धान्य खुल्या बाजारात विक्रीचे प्रमाण वाढले आहे.
-----
उड्डाणपुलाचे काम संथ गतीने
मालेगाव : शहरात २३ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कामाबाबत महासभेत वारंवार चर्चा झाली. तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरीदेखील काम संथ गतीने सुरू आहे.
------
बदलत्या हवामानामुळे रुग्णसंख्येत वाढ
मालेगाव : शहर परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ व रोगट हवामान निर्माण झाले आहे. परिणामी आबालवृद्धांच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
-----
इंधनच्या भडक्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त
मालेगाव : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर शासनाने घरगुती गॅसच्या दरातही वाढ केली आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा तडाखा बसणार आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन होती. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना इंधन दरवाढीमुळे नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडून पडणार आहेत.
-----
किदवाई रस्त्यावरील अतिक्रमण हटवा
मालेगाव : शहरातील किदवाई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. महापालिकेकडे वारंवार अतिक्रमणे हटविण्याची मागणी करूनही दखल घेतली जात नाही. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून थातूरमातूर कारवाई केली जात आहे. पथकाची पाठ फिरताच नागरिकांकडून पुन्हा अतिक्रमणे केली जात आहेत. हा रस्ता मोकळा करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.