लेखणीत सत्ता उलथविण्याची ताकद : बी. जी. वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:06 AM2019-04-24T01:06:26+5:302019-04-24T01:06:54+5:30
लेखकांच्या लेखणीत सत्तांतरे घडविण्याची आणि सत्ता उलथवून टाकण्याची ताकद असते. म्हणूनच जगभरातील सत्ताधाऱ्यांना नेहमीच लेखक, विचारवंतांची भीती वाटत आली आहे.
नाशिक : लेखकांच्या लेखणीत सत्तांतरे घडविण्याची आणि सत्ता उलथवून टाकण्याची ताकद असते. म्हणूनच जगभरातील सत्ताधाऱ्यांना नेहमीच लेखक, विचारवंतांची भीती वाटत आली आहे. अशा अमूल्य विचारांचा ठेवा असलेल्या पुस्तक ांच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल होणे शक्य असून, विचारातील बदल घडविण्याचे सामर्थ्य केवळ पुस्तकात असल्याचे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी बी. जी. वाघ यांनी केले.
सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे आयोजित जागतिक पुस्तक दिन व दिवंगत रामचंद्र काकड यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘वाचन संस्कृती’ विषयावर बी. जी. वाघ यांनी व्याख्यान दिले. ते म्हणाले, लेखकांनी पुस्तकांच्या माध्यमातून खूप मोठे वैचारिक धन समाजाला दिले आहे.
कारण सत्ताधाऱ्यांना विचारवंत लेखकांची नेहमीच भीती राहिली असून, लेखनीत सत्ता उलथवून टाकण्याची शक्ती असल्याचे वारंवार दिसून आले आहे. जगातील सर्वात मोठी फ्रेंच राज्यक्रांती लेखकांच्या आणि विचारवंतांच्या लेखनीचेच फलित असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. दरम्यान, वाचक प्रतिनिधींसह वाचनालयाच्या कर्मचाºयांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी आलेल्या वाचनालयाच्या सभासदांना यावेळी काही पुस्तक ांचे मोफत वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कवी किशोर पाठक, कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, सहसचिव अभिजित बगदे, शंकरराव बर्वे, उदयकुमार मुंगी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शंकर बोºहाडे, तर आभार विवेक उगलमुगले यांनी मानले.