प्रभाग २५ मध्ये विजेचे खांब झाले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:11 AM2021-06-21T04:11:44+5:302021-06-21T04:11:44+5:30

प्रभाग क्रमांक २५ मधील कामटवाडे गांव, दुर्गानगर, इंद्रनगरी, अभियंतानगर, कोकण भवन व मेडिकल कॉलेज परिसरातील धोकेदायक विद्युत तारा व ...

Power poles became dangerous in Ward 25 | प्रभाग २५ मध्ये विजेचे खांब झाले धोकादायक

प्रभाग २५ मध्ये विजेचे खांब झाले धोकादायक

Next

प्रभाग क्रमांक २५ मधील कामटवाडे गांव, दुर्गानगर, इंद्रनगरी, अभियंतानगर, कोकण भवन व मेडिकल कॉलेज परिसरातील धोकेदायक विद्युत तारा व डी.पी.(संरक्षण जाळी)चे पोलबाबत वारंवार निवेदने देऊन संबंधित विभागाला जाग येत नसल्याने, येत्या आठ दिवसांत हा विषय मार्गी न लागल्यास सेना स्टाइल आंदोलन छेडण्याचा इशारा विभाग प्रमुख पवन मटाले यांनी दिला आहे . या संदर्भात शिवसेनेच्या वतीने महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले असून, निवेदनात म्हटले आहे, प्रभाग क्र. २५ मधील कामटवाडे गांव, दुर्गानगर, इंद्रनगरी, अभियंतानगर, कोकण भवन मेडिकल कॉलेज परीसरातील विद्युत तारा ठिकठिकाणी उघड्या व धोकेदायक झालेले आहे, तसेच विद्युत रोहित्र परिसरात लहान मुले खेळत असतात. डी.पी.ना सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक जाळ्या नाहीत. अनेक डी.पी. तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्याची कोणतीही दुरुस्ती केलेली नाही. अनेक वेळा तर मुक्या जनावरांना विजेचा धक्का लागून जखमी झालेले आहे, तसेच त्यांचेवर पानवेलीनी अतिक्रमण केले आहे. त्यामध्ये कधीही विद्युत प्रवाह उतरू शकतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे, तसेच इंदुराई पार्क, दुर्गानगर, कामटवाडे येथे डी.पी.जवळ काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही ना अपंगत्व आले आहे, तरी आजपर्यंत कोणतीही गंभीर दखल घेतलेली नाही.

===Photopath===

200621\20nsk_22_20062021_13.jpg

===Caption===

प्रभाग २५ मध्ये विजेचे खांब झाले धोकादायक

Web Title: Power poles became dangerous in Ward 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.