मातृत्वात जगाला उद्धारण्याची शक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 11:58 PM2021-05-08T23:58:21+5:302021-05-09T00:14:07+5:30
येवला : जगाचा उद्धार करायला भगवंत समर्थ असला तरी प्रत्येकाच्या घरोघरी तो पोहचू शकत नाही म्हणून आई हीच उद्धारकर्त्या परमेश्वराचे रूप मानली जाते. उदात्त मूल्यांचे संस्कार करणारी आईच जगाचा उद्धार करू शकते, असे प्रतिपादन सुवर्णाताई जमधडे यांनी केले.

येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात मातृत्व दिनानिमित्त ऑनलाइन विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून जमधडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे तर प्राचार्य डॉ. सुभाष निकम विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
काल, आज आणि उद्याही आईची महती सारखीच होती, आहे आणि राहील. आई शब्दाची देवालाही नवलाई आहे, म्हणूनच तर पंढरपूरचा विठ्ठल ही स्वतः ला ह्यविठाईह्ण म्हणून घेतो. उदात्त विचारांच्या आईने ध्रुवबाळाला अढळपदापर्यंत पोहोचविले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले, महात्मा गांधींना महात्मा पदापर्यंत पोहोचविले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीनदलितांचा उद्धार करणारे भिमाई झाले, साने गुरुजी मातृहृदयी संस्कारी शाम झाले. अशी हिमालयाच्या उंचीची माणसं आईमुळेच घडू शकली, असे जमधडे यांनी सांगितले.
प्रास्ताविक डॉ. मनिषा गायकवाड यांनी, प्रमुख अतिथींचा परिचय उपप्राचार्य शिवाजी गायकवाड यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी तर आभार प्रा. टी. एस. सांगळे यांनी मानले.