ब्राह्मणगावी ४० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:15+5:302021-06-16T04:18:15+5:30
ब्राह्मणगाव : थकीत वीजबिल न भरल्याने येथील महावितरण कंपनीकडून ४० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अजून आठ रोहित्रांचा ...
ब्राह्मणगाव : थकीत वीजबिल न भरल्याने येथील महावितरण कंपनीकडून ४० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अजून आठ रोहित्रांचा पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती सहायक अभियंता डी. आर. गांगुर्डे यांनी दिली असून, शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
ब्राह्मणगाव येथे एकूण १५० रोहित्र असून, एकूण ३ कोटी ५० लाख वीजबिल थकीत आहे. एका रोहित्रावरील वीजग्राहकांपैकी सर्वच ग्राहकांनी त्वरित बिल भरणे आवश्यक असून आपल्या रोहित्राची वीज खंडित होणार नाही यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करून थकीत बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
वीजबिल थकल्याने बिलावर आकारलेला दंड, व्याज व अन्य कर यामुळे बिलाचे आकडे फुगत आहेत व आता ऐन कोरोना महामारीच्या काळात शेतकरी आर्थिक अडचणीत असताना शेतकऱ्यांना मदत तर दूरच, थकीत बिल वसुली अभियान सुरू केसल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
-------------------
कृषिपंपांचे थकीत वीजबिल वसुली अभियान सुरू असून, शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल भरून सहकार्य करावे, म्हणजे वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही होणार नाही.
-डी. आर. गांगुर्डे, सहायक अभियंता, ब्राह्मणगाव
--------------------
कोरोना महामारीमुळे शेतकरी अडचणीत आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने सध्या तरी सक्तीने वीजबिल वसुली करू नये.
-सुनील मधुकर अहिरे, शेतकरी, ब्राह्मणगाव