दिंडोरी तालुक्यात वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:54 PM2018-06-26T22:54:07+5:302018-06-26T22:55:10+5:30
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील पांडाणे, माळे दुमाला, पिंपरी अंचला, कोल्हेर, कोल्हेर पाडा, हस्ते दुमाला, हनुमंत पाडा या परिसरात रात्रीपासून वीज गेली आहे.
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील पांडाणे, माळे दुमाला, पिंपरी अंचला, कोल्हेर, कोल्हेर पाडा, हस्ते दुमाला, हनुमंत पाडा या परिसरात रात्रीपासून वीज गेली आहे.
पिंपरी अंचला फीडरवरील पिंपरी कोल्हेर, कोल्हेर पाडा या परिसरात वीज रात्री एक ते दीड च्या सुमारास गूल झाल्यामुळे बारा तास उलटूनसुद्धा वीज नसल्याने परिसरात घबराट उडाली आहे तसेच पांडाणे येथील गावातील अर्ध्या गावाचे लाइटचे कनेक्शन गावातील ट्रान्सफॉर्मरवर असल्यामुळे तेथील वीजपुरवठा कधीही खंडित होत नाही. वीजपुरवठा पुणेगाव रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मरवर असल्यामुळे त्या ट्रान्सफॉर्मरवरील नेहमीच एक बत्ती दोन-दोन दिवस बंद असते. आदिवासी नागरिकांकडे कुठल्याही अधिकाऱ्याचा, लाइनमन किंवा विद्युत सहायकांचा भ्रमणध्वनी नसल्यामुळे कोणाशी संपर्कसाधावा, अशी त्यांची अवस्था होते. म्हणून पांडाणे परिसरात वीजमंडळाला लागलेले ग्रहण वरिष्ठांनी लक्ष घालून सोडवावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.