उपनगर परिसरात वीजपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:14 AM2021-02-15T04:14:08+5:302021-02-15T04:14:08+5:30
उद्यानांमध्ये गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव नाशिक : शहरातील बंद उद्यानांमध्ये गवत वाढल्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. यंदा कोरोनामुळे ...
उद्यानांमध्ये गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव
नाशिक : शहरातील बंद उद्यानांमध्ये गवत वाढल्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. यंदा कोरोनामुळे उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीची कामे होऊ शकलेली नाही. त्यामुळे अनेक उद्यानांची दुरवस्था झाली आहे. काही उद्यानांची अपूर्ण बांधकामे पूर्ण करण्यात आली; मात्र झाडाझुडपांची कामे बंदच आहेत.
तात्पुरत्या डागडुजीनंतर पुन्हा खड्डे
नाशिक : उपनगर येथील सिंधी कॉलनी समोरील रस्त्यावर खड्डे पडळ्याने तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मुरूमयुक्त खडी आणि नाममात्र डांबराचे मिश्रण करून खड्डे बुजविण्यात आले होते. या मार्गावर पुन्हा खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
पंडित कॉलनीत झाडांच्या फांद्याांचा धोका
नाशिक : पंडित कॉलनी रस्त्यावर असलेल्या विदेशी झाडे लावण्यात आलेली आहे. जोरदार वारा आणि पावसात या झाडांच्या फांद्या पडत असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. या मार्गावर वर्दळ वाढलेली असल्याने लोंबकळणाºया या झाडांंच्या फांद्या धोकादायक ठरत आहेत. झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केलेली आहे.
टाकळी चौका बनला धोकादायक
नाशिक : नाशिक पुणे महामार्गावरील अवजड वाहतूक टाकळी मार्गे वळविण्यात आल्यामुळे हा चौक धोकादायक बनला आहे. अवजड वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने धोकाही तितकाच वाढला आहे. या चौकातील वाहतूक अन्यत्र वळविण्याची नागरिक मागणी करू लागले आहेत.