निफाडमधील २७ गावांतील पथदीपांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 00:13 IST2021-06-21T22:44:26+5:302021-06-22T00:13:21+5:30
निफाड : महावितरणच्या निफाड उपविभागाच्या वतीने वीजबिल थकल्याने २७ गावांतील पथदीपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

निफाडमधील २७ गावांतील पथदीपांचा वीजपुरवठा खंडित
निफाड : महावितरणच्या निफाड उपविभागाच्या वतीने वीजबिल थकल्याने २७ गावांतील पथदीपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
निफाड उपविभागात घरगुती वीजबिल थकबाकी ४.१३ कोटी, वाणिज्य वीजबिल थकबाकी १.४३ कोटी, औद्योगिक वीजबिल थकबाकी ६.३० कोटी, पथदीप वीजबिल थकबाकी १.४२ कोटी, पाणीपुरवठा वीजबिल थकबाकी १.६ कोटी अशी एकूण ११.३४ कोटी रुपयांची वीजबिलापेटी थकबाकी आहे. कृषिपंप वीज धोरण २०२० अंतर्गत ५० टक्के वीजबिल माफ करण्याची योजना होती, तरीही कृषी वीजपंपाची वीजबिल थकबाकी ८९.२९ कोटी रुपये आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन वीजबिल भरून महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन निफाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे यांनी केले आहे.