निफाड तालुक्यात पथदीपांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:52+5:302021-06-24T04:11:52+5:30
निवेदनात म्हटले आहे की, निफाड तालुक्यातील ४२ गाव ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांचे कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता ...
निवेदनात म्हटले आहे की, निफाड तालुक्यातील ४२ गाव ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांचे कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनीने खंडित केले आहे. सदरची थकबाकी किंवा वीजबिल हे अद्यापपावेतो जिल्हा परिषद यांच्या स्तरावरून अदा केले जात होते. ग्रामपंचायतकडे या बिलासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नसून बिल भरण्यास ग्रामपंचायत असमर्थ आहे. या विषयावर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशीही चर्चा होऊन मंत्रालय स्तरावरून निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. निफाड तालुक्यातील पश्चिम भागातील बऱ्याच ग्रामपंचायतींचा विद्युत पुरवठा खंडित झालेला नाही, असे असताना लासलगाव विभागासाठी वेगळा न्याय का, असा सवालही परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे. याप्रसंगी लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, ब्राह्मणगाव विंचूरचे मंगेश गवळी, विंचूरचे पांडुरंग राऊत, खडकमाळेगावचे दत्ताकाका रायते, सारोळेचे दत्तोपंत डुकरे, कोटमगावचे तुकाराम गांगुर्डे, देवगावचे माजी सरपंच विनोद जोशी, गोंदेगावचे शांताराम कांगणे, प्रवीण नाईक, राहुल शेजवळ, मरळगोईचे रामभाऊ जगताप, कानळदचे शांताराम जाधव, टाकळीचे संतोष राजोळे, ज्ञानेश्वर मोकाटे, राम बोराडे, पिंपळगाव नजीकचे काशीनाथ माळी, लतीफ तांबोळी, वनसगावचे राहुल डुंबरे आदी उपस्थित होते.
फोटो- २३ लासलगाव लाइट
पथदीपांचा खंडित केलेला वीजपुरवठा तातडीने सुरू करावा या मागणीचे निवेदन लासलगावचे उपअभियंता सोनवणे यांना देताना ४२ गाव सरपंच परिषदेचे सदस्य जयदत्त होळकर, मंगेश गवळी आदींसह विविध गावचे सरपंच, पदाधिकारी.
===Photopath===
230621\23nsk_27_23062021_13.jpg
===Caption===
फोटो- २३ लासलगाव लाइट पथदीपांचा खंडित केलेला वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, या मागणीचे निवेदन लासलगावचे उपअभियंता सोनवणे यांना देतांना ४२ गाव सरपंच परिषदेचे सदस्य जयदत्त होळकर, मंगेश गवळी आदींसह विविध गावचे सरपंच, पदाधिकारी.