१२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 02:31 AM2022-03-27T02:31:49+5:302022-03-27T02:32:10+5:30

महावितरणच्या नाशिक परिमंडलातील  घरगुती, औद्योगिक,  वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे व इतर वर्गवारीच्या ६ लाख १८ हजार ग्राहकांकडे सद्य:स्थितीत जवळपास ७७८ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी असून,  आर्थिक स्थिती गंभीर असल्याने ही थकबाकी वसुली करण्यासाठी  थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवत या मार्च महिन्यात १२ हजार ३६० थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.    

Power supply to 12,000 customers disrupted | १२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

१२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Next
ठळक मुद्दे ७७८ कोटींची थकबाकी; महावितरणची मोहीम

नाशिकरोड : महावितरणच्या नाशिक परिमंडलातील  घरगुती, औद्योगिक,  वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे व इतर वर्गवारीच्या ६ लाख १८ हजार ग्राहकांकडे सद्य:स्थितीत जवळपास ७७८ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी असून,  आर्थिक स्थिती गंभीर असल्याने ही थकबाकी वसुली करण्यासाठी  थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवत या मार्च महिन्यात १२ हजार ३६० थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.       
थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत देयकांचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर वा ईमेलवर वीजपुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविली जात आहे. या नोटीसचा विहित कालावधी संपताच ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केल्या जाणार आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर सदर ग्राहकाने वीज देयकाच्या थकबाकीची रक्कम व ग्राहक वर्गवारीनुसार पुनर्जोडणी शुल्क (जीएसटीसह) भरल्यानंतर भौगोलिक भागानुसार साधारणतः पुढील २४ तास अवधीपर्यंत त्या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत जोडणी करण्यास लागू शकतो. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
फेब्रुवारी महिन्यातसुद्धा नाशिक आणि मालेगाव मंडळात ८ हजार ९४३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली होती. ग्राहकांना वेळेत वीज बिल भरता यावे तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी यासाठी ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाइलवर मीटर रीडिंग वीज बिलाचे व इतर आनुषंगिक संदेश दिले जातात; पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने थकबाकीदार ग्राहकांविरोधात  वसुली मोहीम तीव्र करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. 

Web Title: Power supply to 12,000 customers disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.