विविध मागण्यांसाठी वीज कामगारांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:22 AM2018-08-28T00:22:12+5:302018-08-28T00:23:17+5:30
सुरक्षारक्षक, कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगारांना वीज कंपनीत समावून घ्यावे आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट स्टेट इलेक्ट्रिकसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षारक्षक कामगार समितीच्या वतीने वीज भवनसमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले.
नाशिकरोड : सुरक्षारक्षक, कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगारांना वीज कंपनीत समावून घ्यावे आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट स्टेट इलेक्ट्रिकसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षारक्षक कामगार समितीच्या वतीने वीज भवनसमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिकसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षारक्षक कामगार समितीच्या वतीने सोमवारी वीज भवन येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षारक्षक, कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगारांना वीज कंपनीमध्ये कायम सेवेत सामावून घ्यावे, समान काम समान वेतन लागू करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. धरणे आंदोलनामध्ये व्ही. डी. धनवटे, ज्योती नटराजन, राजेश गायकवाड, राजू काजळे, बापूसाहेब जावळे, सुभाष काकड, पंडित कुमावत, बाळासाहेब गोसावी, दीपक गांगुर्डे, राजू नागपुरे आदी सहभागी झाले होते.