पीपीई सूट हीच ‘वर्दी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:15 AM2021-03-23T04:15:30+5:302021-03-23T04:15:30+5:30
उत्तर भारतीयांना ‘खाकी’ मदतीचा हात गेल्यावर्षी लॉकडाऊन झाले आणि दुसऱ्यांदा लॉकडाऊनची मुदत अजून पुढे वाढविली गेली. यामुळे उत्तर भारतीय ...
उत्तर भारतीयांना ‘खाकी’ मदतीचा हात
गेल्यावर्षी लॉकडाऊन झाले आणि दुसऱ्यांदा लॉकडाऊनची मुदत अजून पुढे वाढविली गेली. यामुळे उत्तर भारतीय मजुरांकडे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पैसेही शिल्लक राहिले नाही. अशावेळी खाकी त्यांच्या मदतीला धावून गेली. मध्यवर्ती गुन्हे शाखेने एका खासगी बँकेच्या सहकार्याने पोटाची भूक भागविण्यासाठी आवश्यक असलेला किराणा मालाचा पुरवठा पंचवटीतील कृष्णनगर भागात जाऊन परप्रांतीय मजुरांच्या वस्तीवर केला होता. पोलिसांची ही सामाजिक बांधिलकी त्यावेळी चर्चेचा विषय बनली होती.
---
कोरोना पोलीस मदत कक्ष ठरला मैलाचा दगड
शहरात लागू करण्यात आलेली कडक संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक व अन्य सेवा पुरविण्यासाठी जनसामान्यांकरिता पोलीस आयुक्तालयात ‘कोरोना पोलीस मदत कक्ष’देखील कार्यान्वित करण्यात आला होता. या कक्षामार्फत अत्यावश्यक सेवा पुरविणे तसेच ज्या नागरिकांना प्रवासाची अत्यंत गरज असून, त्यासाठी वैद्यकीय कारण आहे, अशा गरजूंना तत्काळ कोरोना कक्षातून मदत उपलब्ध करून देण्यात येत होती. यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक पोलिसांनी स्वतंत्ररीत्या जाहीर केले होते. हे कक्ष २४ मार्चपासून सप्टेंबरअखेरपर्यंत २४ तास कार्यान्वित होते. या कक्षाद्वारे नागरिकांना ५० हजार ४०४ इतक्या परवानग्या उपलब्ध करून दिल्या गेल्या.