मेजर पी. बी. कुलकर्णी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 12:25 PM2018-11-28T12:25:45+5:302018-11-28T12:43:46+5:30
नाशिक येथील मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाचे माजी सरचिटणीस तसेच भोसला शाळेचे माजी प्राचार्य मेजर पी. बी. कुलकर्णी यांचे बुधवारी पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले ते 92 वर्षांचे होते.
नाशिक- नाशिक येथील मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाचे माजी सरचिटणीस तसेच भोसला शाळेचे माजी प्राचार्य मेजर पी. बी. कुलकर्णी यांचे बुधवारी (28 नोव्हेंबर) पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले ते 92 वर्षांचे होते.
भारताच्या चीन आणि पाकिस्तान युद्धात त्यांचा सक्रिय सहभाग होता. केंद्र सरकारकडून कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला होता. निवृत्तीनंतर ते मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाच्या भोसला सैनिकी शाळेचे प्राचार्य झाले. पुढे या संस्थेचे अनेक वर्षे ते सरचिटणीस होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते सक्रिय झाल्यानंतर संघ परिवाराच्या शीख संगत या विभागाचे काम त्यांनी काम केले. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विश्वस्त मंडळावर काम केले. त्यांना राज्य शासनाने स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार देऊन गौरविले होते. माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते त्यांना स्वातंत्र्य सेनानी पुरस्कार देण्यात आला होता.आज दुपारी दोन वाजता त्यांच्यावर नाशिकच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.