सटाणा बाजार समतिीच्या उपसभापती पदी प्रभाकर रौंदळ यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 09:56 PM2019-07-06T21:56:46+5:302019-07-06T21:57:50+5:30
सटाणा: येथील कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या उपसभापतीपदी तरसाळीचे माजी सरपंच प्रभारकर रौंदळ यांची शनिवारी (दि.6) बिनविरोध निवड करण्यात आली.
सटाणा: येथील कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या उपसभापतीपदी तरसाळीचे माजी सरपंच प्रभारकर रौंदळ यांची शनिवारी (दि.6) बिनविरोध निवड करण्यात आली.
आठ दिवसांपुर्वीच सटाणा बाजार समतिीच्या सभापतीपदाची निवडणुक झाली. त्यात सभापतीपदी संजय सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर उपसभापती सरदारिसंग जाधव यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी शनिवार (दि. 6) सभापती संजय सोनवणे याच्या अध्यक्षतेखाली उपसभापती पदाची निवडणुक घेण्यात आली. यावेळी संचालक प्रभाकर रौंदळ यांचा ?कमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्नय अधिकारी भास्कार तांबे यांनी घोषीत केले. त्यांना सुचक म्हणुन श्रीधर कोठावदे तर अनुमोदक म्हणून मधुकर देवरे होते. यावेळी नविनर्वाचित उपसभापती प्रभाकर रौंदळ यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सभापती संजय सोनवणे, मावळते उपसभापती सरदारिसंग जाधव, संचालक संजय देवरे, पंकज ठाकरे, जयप्रकाश सोनवणे, नरेंद्अहीरे, संदिप साळे, संजय बिरारी,श्रीधर कोठावदे, मधुकर देवरे, प्रकाश देवरे,केशव मांडवडे, संचालीका रत्नमाला सुर्यवंशी, सुनिता देवरे,वेणुबाई माळी, बाजार समतिीचे सचिव भास्कर तांबे आदींसह ज्ञानेश्वर देवरे, भिकन पाटील, मुन्ना सुर्यवंशी, माजी पं.स. सभापती चिला निकम, प्रमोद जाधव, किरण अहीरे, विनोद अिहरे, मच्छीद्र रौंदळ, उमेश रौंदळ, प्रविण रौदळ, निवृत्ती चव्हाण, जिभाऊ रौंदळ, बंटी देवरे, धर्मा रौंदळ, रमेश रौंदळ आदींस कार्यकर्ते उपस्थित होते.