ह्यचला मुलांनो शाळेत चलाह्ण नारा देत जनजागृतीसाठी गावात प्रभात फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 10:44 PM2021-07-14T22:44:32+5:302021-07-15T00:53:57+5:30
जुनी शेमळी : कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शासनाच्या आदेशानुसार आठवी ते दहावी वर्ग गुरुवारपासून (दि. १५) सुरू होत असून जुनी शेमळी (ता. बागलाण) येथील आर. बी. पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी नवी शेमळी, जुनी शेमळी, चिंचकसाड या गावातील विद्यार्थ्यांना ह्यचला मुलांनो शाळेत चलाह्ण असा नारा करीत ढोल-ताशांच्या गजरात गावात प्रभातफेरी काढत जनजागृती केली.

कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी टप्प्याटप्प्याने पाचवी ते आठवीचे वर्ग शाळांमध्ये सुरू केले होते, मात्र पुन्हा कोरोनाचा कहर वाढला. सध्या कोरोना कमी होत असल्याने शासन आदेशानुसार गुरुवार (दि. १५)पासून आठवी ते दहावी वर्ग सुरू होत असल्याने मुलांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
कोरोना व लॉकडाऊनमुळे मार्च २०२० पासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ऑनलाईन वर्ग, क्लासेस सुरू झाले. ऑनलाईनसाठी ॲन्ड्रॉईड मोबाईल व इंटरनेट बॅलन्स गरजेचे होऊन बसले होते. रोज मुलांसमोर सुमारे दोन ते चार तास मोबाईल डोळ्यांसमोर राहू लागला होता. आता मात्र शाळा सुरू होणार असल्याने पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
ऑनलाईन शिक्षणपद्धती आल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांना अडचणीच्या काळात मुलांनी मोबाईल खरेदी करण्यास भाग पडले. परिस्थिती नसतानाही पालकांनी पाल्यांसाठी मोबाईल खरेदी केले. अन्य ठिकाणी मोबाईल नेटवर्क व बॅलन्सअभावी विद्यार्थी वंचित होता. शिक्षकांनी त्या काळात ह्यशिक्षक आपल्या दारीह्ण या उपक्रमाद्वारे ऑनलाईन शिक्षण दिले, त्यामुळे ग्रामीण भागात प्रत्येक विद्यार्थी हा मोबाईलमध्ये गुंतून राहत होता. अलीकडे शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याने मुलांकडून मोबाईल दूर जात असल्याचे चित्र दिसून येणार आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला. या ऑनलाईनसाठी ॲन्ड्रॉईड मोबाईल व नेट बॅलन्सची गरज पडली, मात्र विद्यार्थी ऑनलाईन ऐवजी गेममध्येही रममाण होत होते. मात्र शाळा सुरू होत असल्याने अखेर मुलांच्या हातून मोबाईलची सुटका होणार आहे.
- दादा बागुल, पालक.