प्लास्टिक बंदीबाबत गावात प्रभात फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 04:37 PM2018-08-04T16:37:38+5:302018-08-04T16:39:07+5:30
मानोरी : महाराष्ट्र शासनाच्या कडून ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक मुक्त मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी तालुक्यातील मानोरी बुद्रुक ग्रामपंचायत आणि येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती केली.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) व प्लास्टिक बंदीसाठी तालुकास्तरावर झालेल्या कार्यशाळेत प्लास्टिक बंदी वर गावातील दुकानांत, बाजारात वापरात न आणण्यासाठीच्या सूचना अधिकाºयांकडून देण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक अगरचंद शिंदे, राजू सानप, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सोनाली बैरागी, आशा कार्यकर्त्या सुवर्णा भवर, अंगणवाडी सेविका संगीता कवीश्वर, भाऊसाहेब फापाळे, तुकाराम शेळके, शरद वाघ, जी. एन. मढवई, संभाजी पवार, देवराम शेळके, संतोष शेळके, ग्रामपंचायत कर्मचारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.