संमेलनातील बालमेळाव्याचे उद्घाटन करणार प्रभावळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 01:03 AM2021-02-08T01:03:29+5:302021-02-08T01:03:55+5:30
नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनात यंदाच्या वर्षापासून प्रथमच होणाऱ्या बालमेळाव्याचे उद्घाटन प्रख्यात अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाला बालसाहित्यिक, बालकवींसह प्रभावळकरांच्या उपस्थितीने अनोखी झळाळी लाभणार आहे.
नाशिक : नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनात यंदाच्या वर्षापासून प्रथमच होणाऱ्या बालमेळाव्याचे उद्घाटन प्रख्यात अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाला बालसाहित्यिक, बालकवींसह प्रभावळकरांच्या उपस्थितीने अनोखी झळाळी लाभणार आहे.
भविष्यातही मराठी टिकावी आणि उद्याच्या नागरिकांमध्येदेखील मराठीच्या साहित्याची ओढ जोपासली जावी, या उद्देशाने नाशिकच्या साहित्य संमेलनापासून प्रथमच संमेलनात बालमेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालकट्टा व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात बाल कविसंमेलन, कथाकथन, बाललेखकांशी संवाद, असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. प्रख्यात अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याने त्यांच्या उपस्थितीचा आनंददेखील बालकांसह रसिकांना मिळू शकणार आहे. संमेलनाला येणाऱ्या रसिकांमध्ये बालकांचादेखील अंतर्भाव व्हावा, त्यातून साहित्य संमेलनाचे हे महाद्वार त्यांच्यासाठीदेखील खुले व्हावे, तसेच बालकांमध्येदेखील बालसाहित्यासह अन्य साहित्याची रुची निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याशिवाय या बालवाचकांमधूनच उद्याचे बाललेखक घडावेत, असा प्रयत्न करण्यात येणार आहे.
‘बोक्या सातबंडे’ची यशोगाथा
प्रचंड प्रतिभावान, अष्टपैलू आणि प्रयोगशील अभिनेता ही प्रभावळकरांची मुख्य ओळख असली तरी प्रसन्न हास्याचा शिडकावा करणारा प्रतिभावान लेखक हीदेखील त्यांची दुसरी ओळख आहे, तसेच खुदकन हसवता-हसवता अंतर्मुख करणारे लिखाण करतानाच ‘बोक्या सातबंडे’सारखा गमतीशीर, खट्याळ बालनायक रंगवतानच बालकांच्या मनात संस्कारांची पेरणी करणारे लेखक म्हणूनदेखील प्रभावळकर सर्वज्ञात आहेत. या बोक्या सातबंडेच्या बालकथांना प्रचंड प्रतिसाद लाभल्याने त्याचे तीन खंड प्रकाशित झाले आहेत. वा पुस्तक मालिकेला साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कारदेखील लाभला आहे.