जातेगाव येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 06:55 PM2019-04-13T18:55:06+5:302019-04-13T18:55:32+5:30
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव शनिवारी (दि.१३) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव शनिवारी (दि.१३) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामांचा जन्म झाला. म्हणून हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी १२ वाजण्यापूर्वी मंदिरातील सर्व मूर्तींना अभिषेक करण्यात आला. त्यानंतर प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्तींना आकर्षक फुलांनी सजवून रामजन्माचा सोहळा आला. या कार्यक्र माचे पौरोहित्य दत्तात्रय भट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
शुक्र वार (दि.१२) एप्रल रोजी श्री राम मंदिराचा तिसरा वर्धापनिदन होता त्या अनुषंगाने श्रीराम मंदिर भक्त परिवाराने मंदिरातील सर्व मूर्ती मंदिर सभामंडप व परिसरात स्वच्छता केली होती. शनिवारी सकाळपासूनच प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाची तयारी सुरू होती. यावेळी श्रीराम, लक्ष्मण, सिता, हनुमान यांच्या मुर्तींना फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटप करून उत्सव साजरा करण्यात आला.
राम जणन्माच्या दिवशी साजºया केल्या जाणाºया उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. हणुमान मंदिर, संत सावता महाराज मंदिर महादेव मंदिर येथील भजनी मंडळांनी श्रीराम जन्मोत्सव कार्यक्र मात विविध भजन तसेच श्रीरामांच्या जन्माचा पाळणा म्हणून आणि त्यानंतर आरती व प्रसादाचे वाटप करून कार्यक्र माची सांगता करण्यात आली. यावेळी गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.