हनुमानाच्या वेशभूषेत पगार गुरुजींकडून प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:45+5:302021-05-01T04:13:45+5:30
चक्क हनुमानाच्या वेशभूषेत अवतरलेल्या पगार गुरुजींनी यावेळी हनुमानाने आणलेल्या संजीवनीने लक्ष्मणाला जीवदान मिळाले, कोरोना प्रतिबंधक लस आपल्याला जीवदान देणारी ...
चक्क हनुमानाच्या वेशभूषेत अवतरलेल्या पगार गुरुजींनी यावेळी हनुमानाने आणलेल्या संजीवनीने लक्ष्मणाला जीवदान मिळाले, कोरोना प्रतिबंधक लस आपल्याला जीवदान देणारी असल्याचे प्रबोधनात सांगितले. हनुमानाच्या गीतांद्वारे लोकांना लस घेण्याबद्दल आवाहन केले. वडेल गावात शंभरावर रुग्ण कोरोनाने बाधित होते. अनेकांनी गृहविलगीकरणात उपचार घेतले. अनेक जण रुग्णालयात उपचार घेऊन बरे झाले. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीने पुढाकार घेत कडक उपाययोजना केल्या. या जनजागृती मोहिमेत पगार यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षिता कदम, सरपंच नरेंद्र सोनवणे, उपसरपंच प्रमिला महाले, ग्रामसेवक प्रभाकर वाघ, आरोग्य सेवक तात्या पवार यांनी प्रोत्साहन दिले. या मोहिमेत ग्रामपंचायत कर्मचारी गणेश मोरवाळ यांनी माईक, आबा काकुळते, दिनेश गुरव, सादीक सैय्यद, सतीश बच्छाव, संदीप वाघ, योगेश सोनवणे यांनी आपपल्या परिसरात प्रबोधनासाठी सहकार्य केले. मागच्या आठवड्यात कोविडबाबत घरातच राहा हे वासुदेवाच्या वेशातही लोकप्रबोधन पगार यांनीच केले होते.
कोट...
गावाच्या आरोग्याबाबत जबाबदारी व कर्तव्य पार पाडताना अशा वेगवेगळ्या भूमिका करायला आवडेल. आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. ग्रामस्थांमध्ये लोकजागृती झाली हाच आनंद.
- संदीप पगार, प्राथमिक शिक्षक
कोट...
गावच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा सदैव अभिमान वाटतो. पगार गुरुजींनी उत्स्फूर्त जनजागृतीसाठी पुढाकार घेतला.
- नरेंद्र सोनवणे. सरपंच, वडेल.
फोटो- ३० वडेल हनुमान
वडेल येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक संदीप पगार हनुमानाच्या वेशात लसीकरण जनजागृती करताना.
===Photopath===
300421\30nsk_27_30042021_13.jpg
===Caption===
फोटो- ३० वडेल हनुमान वडेल येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक संदीप पगार हनुमानाच्या वेषात लसीकरण जनजागृती करतांना.