पाडळी येथे स्वाइन फ्लू संदर्भात विद्यार्थ्यांकडून प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 04:58 PM2018-09-19T16:58:42+5:302018-09-19T16:59:34+5:30
सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणेश उत्सवाचे औचित्य साधून परिसरातील नागरिकांना स्वाईन फ्लू आजार, प्रसार व उपाययोजना याबाबत प्रबोधन केले.
विद्यालयातील उपशिक्षक बी. आर. चव्हाण यांनी या रोगाची लक्षणे कारणे व त्यावरील उपाय योजना या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. सध्या या रोगाने सगळीकडे थैमान घातल्याचे सांगितले. त्याकरीता लोकांना आरोग्याविषयी चांगल्या बाबीची सवय लावून घेण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी आपण आपल्या अभ्यासक्र मातील विज्ञान उपयोजित म्हणून आपण सर्वांनी वेगवेगळ्या रोगाची कारण मीमांसा जाणून आपले. आपल्या कुटुंबांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी स्वाईन फ्लू सारख्या रोगाचा विळखा आपल्या भोवती आवळू नका असे आवाहन केले. विद्यालयातील विदयार्थी व सर्व शिक्षक यांनी गावातून जनजागृती फेरी काढून ग्रामस्थांचे प्रबोधन केले. पाडळी व आशापूर येथील ग्रामस्थांना स्वाईन फ्लू आजाराविषयी माहिती दिली. याप्रसंगी शिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, आर. आर. गिते, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए. बी. थोरे उपस्थित होते.