शाळेसाठी विद्यार्थ्यांनीच केले प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:19 AM2021-09-12T04:19:00+5:302021-09-12T04:19:00+5:30
आपली शाळा बंद असल्यामुळे आपले शैक्षणिक नुकसान होत असून, शाळेतील इयत्ता ८वीच्या विद्यार्थ्यांनी एक नवीन समाजप्रबोधन करणारा उपक्रम ...
आपली शाळा बंद असल्यामुळे आपले शैक्षणिक नुकसान होत असून, शाळेतील इयत्ता ८वीच्या विद्यार्थ्यांनी एक नवीन समाजप्रबोधन करणारा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाऊन तेथील लोकांना कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावाला तेच लोक जबाबदार आहेत, जे मास्क वापरत नाहीत, जे नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे मास्कचा नियमित वापर करून हात वेळोवेळी स्वच्छ साबणाने धुऊन आपण स्वतःचे व आपल्या परिसरातील लोकांचे जीवन सुरक्षित ठेऊ शकतो व येऊ करणाऱ्या तिसऱ्या लाटेला आपण आळा घालू शकतो, असे लोकांना समजून सांगितले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल असलेली आवड पाहून परिसरातील लोकांना कुतूहल वाटले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे, ज्योती कोल्हे, सुरेखा आवारे, मुख्याध्यापक प्रदीप देवरे व शिक्षकांनी कौतुक केले.