त्र्यंबकेश्वरला जीएसटीबाबत प्रबोधनात्मक कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:01 AM2017-08-26T01:01:40+5:302017-08-26T01:01:45+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या गंगाजळीत भर पडण्याच्या दृष्टीने १ जुलैपासून देशात सर्वत्र जीएसटी लागू झाला आहे. या कराची करदात्यांना माहिती व्हावी, त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे याबाबत जाणून घेण्यासाठी व त्यांच्या समस्यांचे निरसन होण्यासाठी आज एका कार्यशाळेचे आयोजन तहसीलदार कार्यालयात करण्यात आले होते.
यंबकेश्वर : केंद्र व राज्य शासनाच्या गंगाजळीत भर पडण्याच्या दृष्टीने १ जुलैपासून देशात सर्वत्र जीएसटी लागू झाला आहे. या कराची करदात्यांना माहिती व्हावी, त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे याबाबत जाणून घेण्यासाठी व त्यांच्या समस्यांचे निरसन होण्यासाठी आज एका कार्यशाळेचे आयोजन तहसीलदार कार्यालयात करण्यात आले होते. जीएसटी देश विकासासाठी सुरू करण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या उत्पन्न वाढीसाठी या कराचा उपयोग होणार आहे. जीएसटीची पूर्वतयारी अनेक वर्षांपासून सुरू होती. विविध असे ३१ प्रकारचे कायदे एकत्र करून जीएसटीचा फॉरमॅट तयार करण्यात आला आहे. मात्र, जीएसटी रिटर्न्स भरण्याबाबत व्यापाºयांना ज्या काही समस्या व त्रुटींचा सामना करावा लागत आहे, त्या समस्या व त्रुटी दूर केल्या जातील, असे प्रतिपादन केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधीर डोरवट व अनिरुद्ध राय यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले. येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात जीएसटीवर चर्चासत्र आयोजित केले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधीक्षक राय, अनिरु द्ध पालसिंग, तहसीलदार महेंद्र पवार व व्यापारी करदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार महेंद्र पवार यांनी प्रास्ताविक करीत जीएसटीबाबत येणाºया अडचणी करदात्यांनी मांडल्या. यावेळी अधीक्षक राय अनिरुद्ध पालसिंग म्हणाले, जीएसटीचा ढाचा तयार करण्यात आला आहे; मात्र त्यातील त्रुटी दूर केल्या जाऊ शकतात. भारतीय वस्तू व सेवा कर कायद्याप्रमाणे जगभरात कुठेही कायदा नाही. या कार्यशाळेत किराणा व होलसेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मांगीलाल सारडा ओमप्रकाश सारडा रामेश्वर सारडा दत्तात्रय अप्पा दिवटे यांनी या कराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे जीएसटी टीमने दिली. या सर्व शंकांचे निरसन केले. चर्चेत मांगीलाल सारडा यांचा विशेष सहभाग होता. या बैठकीला केदार सारडा, रामदास वारु णसे, रवींद्र कदम, नंदकुमार कदम, नीलेश कचोळे, श्यामसुंदर भुतडा, अनिल बिरारी, मयूर काळे, हर्षद काळे, आदी उपस्थित होते.