सुखशांतीसाठी धर्माचरण आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:11 AM2020-12-27T04:11:32+5:302020-12-27T04:11:32+5:30
वणी येथे सकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली व संखेश्वर महातीर्थावर समाप्ती झाली. या मिरवणुकीत त्यांच्यासमवेत आलेले १२ आचार्य, ...
वणी येथे सकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली व संखेश्वर महातीर्थावर समाप्ती झाली. या मिरवणुकीत त्यांच्यासमवेत आलेले १२ आचार्य, ७० साधू, साध्वी उपस्थित होते. मुक्तिप्रभू सुरी, कीर्तियश सुरी, श्रेयांसप्रभ सुरी, जयदर्शन सुरी, हर्षवर्धन सुरी, भव्यभूषण सुरी, भुवनभूषण सुरी, वजभूषण सुरी, पुण्यप्रभ सुरी, दिव्यकीर्ती सुरी, निर्मलदर्शन सुरी आदींचा समावेश आहे. दरम्यान, नाशिकमध्येही आचार्यश्रींचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. चिंतामणी संघातर्फे पहाटे सावरकर तरण तलावावरून काढण्यात आलेली मिरवणूक भाविक आराधना भवन येथे विसर्जित झाली. त्यानंतर आचार्य श्री वणीला मार्गस्थ झाले. दरम्यान, नाशिक आणि वणीतील नियोजनासीठी प्रवीण शाह, जयंतीलाल समदडिया, भूपेंद्रभाई शाह, शैलेश शाह, कचरदास पारख, अनुज शाह, गौतम सुराणा, अभय कटारिया, दिलीप पारख, प्रकाश बोथरा, सुभाष शाह, वर्धमान बोरा, पारस सिसोदिया, जितूभाई शाह, अनिल पारख, प्रवीण बोरा, अलकेश समदडिया, संजय बोरा आदी कार्यकर्ते, संघाचे हितचिंतकांनी जबाबदारी स्वीकारली आहे.
इन्फो-
सामुदायिक आत्मचिंतनासाठी बैठक
गच्छाधीपती आचार्य पुण्यपालसुरीश्वरजी महाराज यांनी ६४ वर्षांपूर्वी १९५६ मध्ये ८ वर्षाचे असताना वणीतच दीक्षा घेतली होती. आज त्यांच्या दीक्षास्थानावर वणीत आत्मचिंतनाची बैठक होत आहे. हा एक अनोखा योगायोग जुळून आला आहे. या सोहळ्यात बुधवारी (दि.३०) मुंबईतील बोरिवली येथील श्राविका लक्ष्मी पूनमचंद डागा यांनी केवळ गरम पाण्यावर सलग १८० निरंकार उपवासाची पूर्णाहुती होणार आहे. ६८ वर्षीय लक्ष्मी डागा यांनी आत्मकल्याणासाठी व मोक्षप्राप्तीसाठी हे उपवास केले.
(आरफोटो-२६सुरीश्वर महाराज) -वणी येथे व्याख्यानात बोलताना वर्तमान गच्छाधीपती आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी म. सा. समवेत. मुक्तिप्रभू सुरी, कीर्तियश सुरी, श्रेयांसप्रभ सुरी व साधू-संत.
(आरफोटो-२६ लक्ष्मीदेवी डागा)