नृत्यसाधना कला अकॅडमीतर्फे ‘प्रगती उत्सव-२०१९’ रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:25 AM2019-03-13T00:25:43+5:302019-03-13T00:25:59+5:30

शास्त्रीय संगीत नृत्याशी संलग्न असलेली संस्था नृत्यसाधना अकॅडमीतर्फे प्रगती उत्सव २०१९ हा भरतनाट्यम उडिसी नृत्य व नृत्ययोग हा कार्यक्रम रंगला़ तसेच या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कलावंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आला़

'Pragati Utsav-099' Rangasuddha Kala Akademi | नृत्यसाधना कला अकॅडमीतर्फे ‘प्रगती उत्सव-२०१९’ रंगला

नृत्यसाधना कला अकॅडमीतर्फे ‘प्रगती उत्सव-२०१९’ रंगला

Next
ठळक मुद्देकलागुण सादर : कलाकारांना पुरस्कार

नाशिक : शास्त्रीय संगीत नृत्याशी संलग्न असलेली संस्था नृत्यसाधना अकॅडमीतर्फे प्रगती उत्सव २०१९ हा भरतनाट्यम उडिसी नृत्य व नृत्ययोग हा कार्यक्रम रंगला़ तसेच या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कलावंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आला़
नृत्यसाधना अकॅडमीतर्फे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाकवी कालिदास कलामंदिरात प्रगती उत्सव हा नृत्याविष्कार संपन्न झाला़
यावेळी ज्येष्ठ नृत्यांगना देवी बासू यांनी जटायू मोक्ष सादरीकरण केले़ रामायण काळातील या नृत्य सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद मिळाली़
याप्रसंगी अ‍ॅड़ सदाशिवराव देवे पुरस्कार झेलम परांजपे यांच्या स्मितालय संस्थेत भरतनाट्यमचे शिक्षण घेणाऱ्या अंकुर बल्लाळ यांना प्रदान करण्यात आला़ सदर पुरस्कार डॉ़ संगीता पेठकर व दिनेश पेठकर यांच्या हस्ते देण्यात आला़ यावेळी नीलिमा पवार, डोरजे, देवी बासू, उध्दव आहेर, विलास बिरारी, नितीन पवार आदींचा सत्कार करण्यात आला़ त्याचप्रमाणे जननी पुरस्कार मिताली काळे, खुशबू जयन, मध्यमा गुर्जर या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आला़ सदर पुरस्कार सदानंद देवे यांच्या हस्ते देण्यात आला़ तसेच कुसुदिनी पुरस्कार रसिका नातू यांना देण्यात आला़ यावेळी हेमा बासू, अनघा जोशी, पूजा निंबाळकर, योगेश नांदुर्डीकर, अंजली काळकर, समर्थ निकम, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व कलारसिक उपस्थित होते़
तबला जुगलबंदी
नृत्यसाधना कला अकादमीच्या विद्यार्थिनींनी कृष्णा द सेव्हीयर ही नृत्यरचना सादर केली़ यात प्रामुख्याने कृष्णाची रासलीला, कंसवध, कौरव-पांडव द्यूत या प्रसंगांचा समावेश होता़ तसेच पवार तबला अकादमीचे नितीन पवार आणि शिष्यगणांनी तबला जुगलबंदी सादर करून रसिकांची मने जिंकली़

Web Title: 'Pragati Utsav-099' Rangasuddha Kala Akademi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.