लोहोणेर जनता विद्यालयात गुणगौरव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:08 PM2020-01-01T23:08:27+5:302020-01-01T23:08:55+5:30
लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा झाला. अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बागलाण पंचायत समितीचे माजी सभापती परशुराम आहिरे, रवींद्र पवार, एस. आर. सूर्यवंशी, भैयासाहेब देशमुख, रमेश आहिरे, रतीलाल परदेशी, अविनाश महाजन, पंडित पाठक, अशोक आहिरे आदींसह मुख्याध्यापक आर. एच. भदाणे, पर्यवेक्षक कल्पना काळे, ज्येष्ठ शिक्षक यू. के. भदाणे व्यासपीठावर उपस्थित होते.
लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बागलाण पंचायत समितीचे माजी सभापती परशुराम आहिरे, रवींद्र पवार, एस. आर. सूर्यवंशी, भैयासाहेब देशमुख, रमेश आहिरे, रतीलाल परदेशी, अविनाश महाजन, पंडित पाठक, अशोक आहिरे आदींसह मुख्याध्यापक आर. एच. भदाणे, पर्यवेक्षक कल्पना काळे, ज्येष्ठ शिक्षक यू. के. भदाणे व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यालयाच्या गीतमंचाने स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले. विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मानचिन्ह, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक राकेश थोरात यांनी केले. एस. आर. सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.तुषार शेवाळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून ते अंगीकारले पाहिजे, असे मत शेवाळे यांनी व्यक्त केले. शेवाळे यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राकेश थोरात आणि सुनील एखंडे यांनी केले.