नामपूरला महिलांचा गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 02:36 PM2020-03-16T14:36:19+5:302020-03-16T14:36:40+5:30
नामपूर : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचिलत हिरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठाण आयोजित जागतिक क्रि डा सप्ताहा निमित्त नामपूर परिसरातील शिक्षण, अध्यात्म, कृषि, क्र ीडा,आरोग्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळीक्रीडाआधिकारीनाईकम्हणालेकी, , पुरस्कारार्थी महिलांची सामाजिक जबाबदारी आता वाढली आहे,त्यांच्या ज्ञान आणि कर्तुत्वाचा उपयोग समाजातील युवा पीढी साठी व्हायला हवा.
पुरस्कार्थींमध्ये शांताबाई सूर्यवंशी,वर्षा शिरु डे, माधुरी पाठक,मनीषा कापडनिस,योगिता शिरोरे,रजनी कोठावदे,बेबीबाई चव्हाण,निधि देवरे,दयाराम सूर्यवंशी,कमलबाई बेडसे, कांताबाई अहिरे, सिंधुबाई सोनवने,वैशाली आहिरे,प्रा.डॉ. सूरेखा दप्तरे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .
पुरस्कारार्थी कडून स्नेहलता शरद नेरकर, योगिता शिरोरे,सुरेखा दप्तरे, माधुरी पाठक, वर्षा शिरु डे व निलेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक एम.आर.क्षिरसागर यांनी केले, सूत्र संचालन हर्षल बच्छावयांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ.एम. डी. आहिरे यांनी मानले.
कार्यक्र मासाठी तालुका क्र ीडा अधिकारी संदीप ढाकणे, बाळासाहेब भदाने, आण्णासाहेब सावंत ,भाऊसाहेब आहिरे, , शरद नेरकर. नारायण सावंत. शरद केदारे,आदि उपस्थित होते.