नाशिकच्या स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ प्रकाश थवील यांची उचलबांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 07:09 PM2019-09-09T19:09:01+5:302019-09-09T19:10:39+5:30
नाशिक- महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीचे वादग्रस्त सीईओ प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी करण्याचा निर्णय महापालिकेच्या महासभेत घेण्यात आला. थविल यांच्या वागणूक, नगरसेवकांना माहिती न देणे यासह अन्य कारभारावर नगरसेवकांनी ताशेरे ओढले आणि कंपनीच्या कारभारामुळे महापालिकला बदनाम होत असल्याचा आरोप केला. त्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी थविल यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देखील सोमवारी (दि. ९) झालेल्या महासभेत दिले.

महापालिकेची महासभा सोमवारी (दि.९) पार पडली. यावेळी मखमलाबाद येतील नगररचना परियोजना राबविण्यासाठी इरादा जाहिर करण्याच्या विषयावरून स्मार्ट सिटीच्या कामकाजावर वादळी चर्चा झाली. विशेषत: प्रकाश थवील यांना दुरध्वनी केल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही याबाबत कंपनीचे संचालक व नगरसेवक गुरूमित बग्गा यांती तक्रार केली तेव्हा थविल हे हासत होते. त्यामुळे थविल यांच्या कारभारावर नगरसेवकांनी ताशेरे ओढलेच शिवाय त्यांना महापालिकेकडून कंपनीला किती निधी मिळाला आणि २१ कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात येत असल्याच्या रस्त्याची रूंदी देखील सांगता आली नाही त्यामुळे आवाक झालेल्या साऱ्याच सदस्यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या सभागृहाने असे अनेक अधिकारी बघितले आहेत. गेल्यावर्षी तत्कलीन आयुक्त तुकाराम मुंढे नगरसेवक बोलत असताना असेच हसत असायचे त्यामुळे तुमचे काय होईल ते बघा असे सांगत त्यांना सूचक इशारा देखील दिला. त्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी थविल यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देखील सोमवारी (दि. ९) झालेल्या महासभेत घेतला.
महासभेत झालेल्या चर्चेत सुधाकर बडगुजर, शाहु खैरे, डॉ. हेमलता पाटील स्मार्ट सिटीच्या कामकाजावर टीका केलीच. शिवाय स्थायी समिती सभापती उध्दव निमसे यांनी मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड योजना यशस्वी करायची असेल तर थविल यांची बदली करून चांगला अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली होती.