धामणगावजवळ अपघातग्रस्त बिबट्याचे वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 02:38 PM2018-12-15T14:38:10+5:302018-12-15T14:38:25+5:30

घोटी : सिन्नर घोटी महामार्गावरील धामणगाव जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अखेरचा श्वास घेणार्या बिबट्याला वन खात्याच्या अधिकार्यांमुळे जीवदान मिळाले आहे.

Pran survives the accident of the leopard near Dhamangaon | धामणगावजवळ अपघातग्रस्त बिबट्याचे वाचविले प्राण

धामणगावजवळ अपघातग्रस्त बिबट्याचे वाचविले प्राण

Next

घोटी : सिन्नर घोटी महामार्गावरील धामणगाव जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अखेरचा श्वास घेणार्या बिबट्याला वन खात्याच्या अधिकार्यांमुळे जीवदान मिळाले आहे. काल रात्री साडे दहा वाजेच्या वेळी एका वाहनाने बिबट्याला अपघातग्रस्त केल्याने बिबट्या महामार्गावर पडला असल्याची माहिती मिळताच वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने बिबट्याचा जीव वाचवला. योग्य वेळेत अत्यावश्यक उपचार मिळाल्याने बिबट्याचा जीव वाचला असल्याची माहिती टाकेद बुद्रुकच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री तळपाडे यांनी दिली. धामणगाव जवळ रात्रीच्या वेळी मुक्तसंचार करणारा बिबट्या फिरत होता. काल रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक अज्ञात वाहनाची धडक बिबट्याला बसली. यामध्ये तो रक्तबंबाळ झाला. महामार्गावर तो निपचित पडून अखेरचा श्वास घेत होता. या घटनेबाबत या भागाचे वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी माहिती समजली. त्यांनी तातडीने वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांचे मार्गदर्शन घेतले. वनरक्षक रेश्मा पाठक, संतोष बोडके, बबलू दिवे, भोराबाई खाडे, फैजअली सय्यद, दशरथ निरगुडे, श्रावण निरगुडे, रामदास बगड, मुरलीधर निरगुडे यांच्या मदतीने बिबट्याला स्वत:च्या वाहनात टाकले. पिंजºयाची वाट न पाहता तातडीने अत्यावश्यक उपचार करण्यासाठी टाकेद बुद्रुक येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात सुरू केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री तळपाडे आणि वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी योग्य वेळेत उपचार सुरू केले. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या उपचारांमुळे अखेरचा श्वास घेऊन मृत्यूघंटेला लागणार्या बिबट्याचा प्राण वाचला. वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले की वन खात्याच्या अधिकार्यांच्या दक्षतेमुळे बिबट्याचा जीव वाचला आहे. उशीर झाला असता तर बिबट्या जागीच गतप्राण होण्याची अधिक शक्यता होती. सध्या अशोक स्तंभावरील पशु वैद्यकीय दवाखान्यात बिबट्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

Web Title: Pran survives the accident of the leopard near Dhamangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक